20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeनांदेडआरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा गोळीबार

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा गोळीबार

एकमत ऑनलाईन

नांदेड : वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खुन प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गोळीबार करावा लागला. यानंतर खंजरधारी मुख्य आरोपीसह अन्य एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.दरम्यान जखमी आरोपी फरार झाला आहे. सदर थरारक घटना दि. २७ जुलै रोजी माळटेकडी भागातील रेल्वे ब्रिज जवळ घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,शहरातील अटल गुन्हेगार सोन्या राजेंद्र चव्हाण यांच्यावर जुलै महिन्यात वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते. दि.२७ जुलै रोजी माळटेकडी भागातील रेल्वे ब्रिजजवळ सोन्या हा आरोपी असल्याची खबर वजिराबाद पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी साफळा रचून आरोपीला पकडण्याठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

तेव्हा पोलिसांनी त्यास शरणागती पत्करण्यास आव्हान केले.मात्र सोन्या राजेंद्रसिंग चव्हाण याने आपल्या जवळ असलेला खंजर काढून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस जमादार व्यंकट गांगुलवार यांनी जवळ असलेल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. यांनतर आरोपीला माळटेकळी भागातील गुरुद्वारा परिसरातून गराडा घालून जेरबंद करण्यात आले. या मुख्य आरोपीसह एका विधीसंघर्ष बालकास पकडण्यात आले.

शहरातील अट्टल गुन्हेगार सोन्या चव्हाण याच्या विरुद्ध वजिराबाद विमानतळासह इतर पोलिस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपीला पकडण्याची कारवाई करण्यात आली.या कारवाईत पोलिस उपनीरिक्षक अब्दुल रब, वरपडे, जमादार दशरथ जाधव, कदम यांच्यासह इतर कर्मचा-यांनी कामगीरी फत्ते केली.दरम्यान याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक आगलावे यांनी दिली.

जखमी आरोपी फरार
मंगळवारी सकाळी सोनु भोंगला शोधण्यासाठी वजिराबादचे पोलिस पथक लक्ष्मीनगर येथे एका घरात गेले होते. तेंव्हा पोलिसांना खंजीर दाखवून सोनु भोंग पळून गेला. मात्र त्याच्यासोबतचा विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आरोपी एका दुचाकीवरुन माळटेकडीकडे पळत असताना पोलिसांनीही त्यांचा पाठलाग केला. यावेळी पोलिसांवर त्यांनी खंजर फेकून मारली. मात्र पोलिसांनी तो नेम चुकवत जमादार व्यंकट गांगुलवार यांनी गोळीबार केला. ती गोळी एकाच्या पायाला लागला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र पोलिसांनी सोनसिंग भोंगला अटक केली. जखमी झालेला आरोपी मात्र फरार झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

संसदेत ट्रॅक्टर प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या