नांदेड : प्रतिनिधी
तेलंगणा राज्यातील एक पोलिस कर्मचारी न्यायालयात भरण्यासाठी दिलेले ५ लाख रुपये घेवून ९ मार्चपासून गायब झाला आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याच्या शोधासाठी खानापूर जि. निर्मल येथील पोलिस पथक नांदेडला आले होते. वजिराबाद पोलिसांच्या मदतीने या पोलिसाचा पथकाने शोध घेतला. परंतू तो उद्याप सापडला नाही.
तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्याच्या खानापूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस अंमलदार जी.भिमेश्र्वर हा पोलिस अंमलदार बक्कल नंबर ३०४२ हा खानापूर येथे कोर्ट ड्युटी करत होता. दि.९ मार्च रोजी सकाळी त्याला ५ लाख रुपये न्यायालयात जमा करण्यासाठी देण्यात आले. पण तो न्यायालयातच गेला नाही.पोलिस ठाण्याच्या मागेच पोलिस वसाहतीत तो राहत होता. त्याची पत्नी जी.स्नेहलता भिमेश्र्वर यांनी दिलेल्या तक्रारीनूसार खानापूर पोलिसांनी जी.भिमेश्र्वर जी.राजन्ना वय ३५ हा पोलिस कर्मचारी बेपत्ता झाल्याची नोंद क्रमांक ३५/२०२३ नुसार दि.१० मार्च रोजी दाखल केली आहे.
या नोंदीमध्ये जी.भिमेश्र्वर यांची उंची ६ फुट, बांधा सडपातळ, रंग गोरा, डोळे सर्वसाधारण गोलचेहरा, केसांचा रंग काळा, त्याने ९ तारेखेला परिधान केलेला पेहराव पांढ-यांचा गोल गळ्याचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असे लिहिले आहे. या तक्रारीनंतर खानापूर जिल्हा निर्मल राज्य तेलंगणा येथील पोलिस पथक दि.११ मार्चच्या रात्री नांदेडला आले होते. कारण जी.भिमेश्र्वर याच्याकडे असलेला मोबाईल क्रमांकानुसार त्याचे लोकेशन नांदेड दाखवत होते.