24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडनांदेड शहरात पोलिसांचे पथसंचलन

नांदेड शहरात पोलिसांचे पथसंचलन

एकमत ऑनलाईन

नांदेड : रामनवमीसह आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आणि घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून मोठ्या फौजफाट्यासह इतवारा ते भाग्यनगरपर्यंत संपूर्ण नांदेड शहरातून पथसंचलन करण्यात आले. या फौजफाट्याच्या पथसंचलनामधून गुन्हेगारांना आम्ही कारवाईसाठी सज्ज आहोत, असा इशाराच दिला आहे.

नांदेडसह देशभरात उद्या दि.१० एप्रिल रोजी रामनवमी हा सण साजरा होणार आहे. दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे.यासोबतच आगामी काळात अनेक सण उत्सव साजरे होत आहे.या उत्सवात नागरिका मोठया प्रमाणात सहभागी होतात.मात्र मागील काही दिवसात घडलेल्या गंभीर घटनामुळे नागरिकांत काहिसे भितीचे वातावरण आहे. ही भीती दूर करण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी पथसंचलन करण्यात आले.

यात अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, जगदीश भंडरवार, डॉ.नितीन काशीकर, सुधाकर आडे, अनिरुध्द काकडे यांच्यासह अनेक सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, क्युआरटी पथकाचे जवान, महिला व पुरूष पोलीस अंमलदार तथा गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते. इतवारा येथून सुरू झालेले पथसंचलन भाग्यनगर पोलिस ठाण्यापर्यंत नेण्यात आले. रामनवमी मिरवणूकीच्या संदर्भाने इतवारा ते अशोकनगर या भागात अनेक ठिकाणी नवीन सीसीटीव्ही कॅमरे लावले आहेत. शिवाजीनगर भागात अनेक कॅमेरे लावण्यात आले असून दोन्ही दुभाजकात लाकडी बॅरिकेची भिंत तयार करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या