26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडपार्सलवरील पाकिस्ताननगर पत्त्याने पोलिस चक्रावले

पार्सलवरील पाकिस्ताननगर पत्त्याने पोलिस चक्रावले

एकमत ऑनलाईन

नांदेड : सध्या विविध गुन्ह्याच्या मालिकांमुळे नांदेड शहर चर्चेत आले आहे. यात एका कुरिअर पार्सलवरील पाकिस्ताननगर या पत्त्याची भर पडली. या प्रकाराने पोलिस चक्रावले होते. मात्र चौकशीअंती हा प्रकार चुकीने झाल्याचे सत्य झाले उघड झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

देगलूर नाका भागातील शेख खलील वय २५ या तरुणाने आपल्या लहान पुतण्यासाठी ऑनलाइन कपडे मागवले होते. या कपडयाची डिलिव्हरी कोलकत्ता येथून होणार होती. यानुसार कपड्याचे पार्सल खलील याला मिळाले. पण त्या पार्सलवरील पत्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आणि हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत गेल्याने ते ही चक्रावून गेले होते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा सत्य पुढे आले. कपडे कुरिअरने मागवणा-या शेख खलील या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्याची चौकशी केली.

त्यांनंतर हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खलील या तरुणाला लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्याने मोबाइलमधून व्हाइस रेकॉर्ड करून संबंधित कंपनीला त्याचा पत्ता त्या अ‍ॅपवर पाठवला होता. कंपनीने खलील याच्या नावाखाली पाकिजानगर लिहिण्याऐवजी पाकिस्ताननगर, नांदेड असा पत्ता लिहिला. आणि हे कंपनीने गैरसमजातून टाकल्याचे स्पष्ट झाले.

नांदेड शहरात किंवा जिल्ह्यात पाकिस्ताननगर नावाचे कुठलेही नगर नाही. नांदेड शहरात देगलूर नाका भागात पाकिजानगर आहे. हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धबडगे यांनी सांगितले. सोशल मीडियावर अशा कुठल्याही अफवा किंवा जाती-धर्मात तेढ निर्माण होणा-या पोस्ट टाकू नये. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक धबडगे यांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या