33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड नांदेड जिल्ह्यात मतदान शांततेत; दुपारपर्यंत ६९.९२ टक्के मतदान

नांदेड जिल्ह्यात मतदान शांततेत; दुपारपर्यंत ६९.९२ टक्के मतदान

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान झाले. जिल्ह्यात २ ते ३ ठिकाणी भांंडण तथा हाणामारीचे घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६९.९२ टक्के मतदार झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदानाची टक्केवारी काढण्याचे काम सुरू होते. मतदानाची प्रक्रिया पारपडली असून आता निकालाची उत्सुकता लागली आहे.

उमरी : तालुक्यात ४८ ग्राम पंचायतची निवडणुक होती यात १३१ मतदान केंद्र होते.सर्व मतदान केंद्रावर सकाळ साडे सात ते सायंकाळी साडे पाचपर्यंत मतदान घेण्यात आले. यात एकुण मतदान ५१११८ मतदान पैकी एकुण ४३०४९ मतदान झाले यात २०३७० महिलांनी आपल्या मतांचा हक्क बजावले तर २२६७९ पुरूष आपल्या मतांचा हक्क बजावले यात एकुण ४३०४९ मतदान झाले यात ८४.२१ टक्के तालुक्यात मतदान झाले. बेलदारा गावात सकाळी आकरा वाजता मशीन बंद पडली होती ती तात्काळ बदलण्यात आले असल्याचे माहिती तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी दिले. तर मौजे कळगाव येथे दोन गटात बोगस मतदानावरुन बुथ केंद्रावर हाणामारी झाली.या दोन्ही गटावर गुन्हे दाखल होतील अशी माहिती पोलीसांनी दिले.

कंधार: तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीतील ६७३ सदस्य सार्वत्रिक निवडणुकीतून निवडण्यात येणार आहेत एकूण २७९ मतदान केंद्रावर १ लाख ३८ हजार १८२ मतदारा पैकी १ लाख १२ हजार ४३९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदानाची टक्केवारी ८१.६७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली. तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे ८२ ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. ८४१ ग्रामपंचायत सदस्या पैकी १५६ जण बिनविरोध निवड झाली असून १२ जागा रिक्त आहेत त्यामुळे ६७३ जागांसाठी १५६५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

किनवट: तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायतच्या संपन्न झालेल्या आजच्या मतदानातून १८२ जागेसाठी ४०२ उमेदवार रिंगणात होते .दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७१ . ९८ टक्के मतदान झाले होते . ४०२ उमेदवारांचे भवितव्य आता मतदान पेटी सील बंद झाले आहे . आता उत्सुकता आहे ती निकालाची कोणाची दिवाळी साजरी होणार कोणावर संक्रात येणार हे दिनांक १८ च्या मतमोजणी तुन समोर येईल . किनवट तालुक्‍यात एकूण २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यात गोंडे महागाव व फुलेनगर या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने चोवीस ग्रामपंचायतच्या निवडणूका आत संपन्न झाल्या.

नांदेड समृद्धी महामार्गाला जोडणार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या