27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडपरिक्षा पुढे ढकला; विद्यार्थ्यांचे आंदोलन

परिक्षा पुढे ढकला; विद्यार्थ्यांचे आंदोलन

एकमत ऑनलाईन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात होऊ घातलेल्या परीक्षा पुढे ढकल्यात या मागणीसाठी विद्यार्थी संघटनेच्या वतिने सोमवारी विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात आले.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातंर्गत सध्या परिक्षा होत आहेत. परंतू बहुतांश महाविद्यालयामध्ये शिकवणी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे विधार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेले नसतांना सराव परीक्षा सुद्धा मागील एक,दोन दिवसापूर्वी झाल्या आहेत. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ भेटला नाही़ तसेच मागील दोन वर्षांपासून परीक्षा या एमसीक्यु पद्धतीने घेतल्या गेल्या़ यावेळी परीक्षा कशा पद्दतीने होतील हे उशिरा समजल्याने परीक्षाची तयारी झालेली नाही़. अभासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवला गेला व परीक्षा या ऑफलाईन पद्धतिने घेतल्या जात आहेत.

यामुळे होऊ घातलेल्या परीक्षा या पुढे ढकलव्यात या मागणीसाठी विद्यार्थी संघटनेच्या वतिने आंदोलन करण्यात आले़ यावेळी कुलगुरू डॉ़ उद्धव भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतीक देमनगुंडे , फैसल सीदिकि , निखिल वाघोळे, अझीम शेख , प्रसाद पवार, महेश देवसरकर यांच्यासह अनेक विद्याथी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या