21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडदोन महिन्यांपासून बोरी (खु.) गावचा वीज पुरवठा खंडित

दोन महिन्यांपासून बोरी (खु.) गावचा वीज पुरवठा खंडित

एकमत ऑनलाईन

कंधार : शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. बत्तीगुलमुळ नागारीकांमध्ये महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरासह तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागात रात्री-अपरात्री तसेच दिवसाही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतच जात आहे. या प्रकारामुळे गृहिणींसह, ग्रामस्थ, तरुण व छोट्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तर मौजे बोरी (ख.) गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण गावच अंधारात आहे. यामुळे पाणीपुरवठ्यावरही परीणाम होत असल्याने नागरीक वैतागले आहेत.

महावितरण कंपणीचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मागच्या दोन महीण्यापासुन मौजे बोरी (खु.) येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आल्सरने दोन महिन्यांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गावचा पाणी पुरवठाही बंदच आहे.विजेच्या लपंडावामुळे नागरिक, व्यावसायिकांसह शेतकरी वर्ग हैराण झाले असून, वीज बिल भरण्यासाठी तगादा लावणारे महावितरण विना खंडित वीजपुरवठा कधी करणार, असा सवाल नागरिकांमधून होत आहे.

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक गणिते कोलमडून गेली असताना वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने विजेवर अवलंबून असणारे, तसेच व्यावसायिकांना वेळेचे बंधन जिल्हाधिका-यांनी घातल्याने चांगलीच अडचण झाली आहे. दुकाने उघडूनही वीज नसल्याने काम करणे अवघड होऊन बसले आहे. यामुळे व्यवसायिकांना आर्थिक फटकादेखील बसत आहे. शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत बोरी (खु) गाव वसलेले आहे. या गावची लोकसंख्या जवळपास २ हजार इतकी आहे. मात्र या गावाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठाही बंदच आहे.

फेब्रुवारी महिन्यात अंदाजे तीन लाख रुपये अर्थात ८० टक्के वसूली गावाने महावितरणला करुन दिली आहे. तरीही माळाकोळी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हे वीज पुरवठा सुरळीत करुन देत नाहीत. ग्रामसेवक व सरपंच हे महावितरणचे अधिकारी व कर्मचा-यांकडे वारंवार चकरा मारत आहेत. तरीही वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. वीज पुरवठा सुरळीत सुरू करुन देण्यात यावा, अशी मागणी बोरी (खु) गावचे ग्रामसेवक श्रीधर विश्वासराव व सरपंच सुनिता पंदनवाड यांनी नांदेड महावितरणच्या ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

व्यावसायिकांना आर्थिक फटका
गावात मागच्या काही दिवसापासुन विज पुरवठा खंडीत असल्याने गावातील छोट्या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. सततचा लॉकडाऊन आणि त्यात असे अडथळे, यामुळे लघु व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वरीष्ठांनी या गंभीरबाबीकडे लक्ष घालुन विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी येथील नागरीक व व्यावसायिकांनी केली आहे.

योजनेच्या ३० हजारांसाठी २१ महिला झाल्या विधवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या