23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडप्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग

प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग

एकमत ऑनलाईन

लोहा: लोहा कंधार तालुका हा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच कार्यकर्त्यात अस्वस्थता पसरली आहे. पण एकमेकांना सावरत सर्वांनी त्यांच्या लवकर बरे व्हा असे साकडे देवाकडे घातले आहे.

कोविड १९ वैश्विक महामारीच्या काळात जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर गेल्या १२५ दिवसापासून अहोरात्र जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात गेले व जात आहेत . कोरोना काळात लोकांच्या अडीअडचणी सोडवत आहेत त्यांना मदत करत आहेत.मग ते जिल्ह्यात असो की राज्यात व राज्या बाहेर त्यांच्या समस्येचे निराकरण करत आहेत. संकटकालीन काळात लोकांच्या गरजा व त्याच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी नेहमीच मदतीला धावून येते इतकेच नव्हे तर येथेच आपले काम होते याच विश्वास दृढ झाला त्यामुळे साई -सुभाष चे कौटुंबिक ऋणानुबंध तयार झाले.

लोहा कंधार तालुक्यावर खा चिखलीकर यांचे विशेष लक्ष येथील लोकांना त्यांनी नेहमीच सहकार्य केले कोरोना काळात खा प्रतापराव यांच्या प्रमाणेच प्रवीण पाटील, प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी या मतदारसंघात आपले कार्य अविरत सुरू ठेवले आहे. युवा नेते प्रवीण पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच कार्यकर्ते अस्वस्थ झाले. चिंता वाढली.प्रत्येकजण आपल्या कुटुंबा प्रमाणे आस्थेवाईकपणे विचारपूस करू लागला. खा प्रतापराव पाटील यांना भ्रमणध्वनी अनेकांनी संवाद साधला. प्रवीण पाटील लवकर बरे होतील असा धीर देत होते तसेच सोशल मीडियातून मित्र परिवार कार्यकर्ते यांनी प्रवीण पाटील यांना लवकर निरोगी व्हावे. यासाठी शुभकामना व्यक्त केली.

विरोधी पक्षातील कार्यकर्ते ..नेत्यांनी.. पक्ष मतभेद असतील पण मनभेद नाहीत असे म्हणत लवकर सुदृढ व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. अस्वस्थ कार्यकर्त्यांनी तर देवाला साकडे घातले नवस केले.युवा नेते प्रवीण पाटील बरे व्हावे म्हणून प्रार्थना करत आहे. कार्यकर्त्यांचे पाठबळ व हजारो लोकांच्या आशीवार्दामुळे चिखलीकर परिवार कधीच आघाताने, आजाराने खचले नाही.मोठी हिम्मत यावेळी सुद्धा आहे़ कोरोनाचा वाढता संसर्ग पत्नी म्हणून व आई म्हणून प्रतिभाताई प्रतापराव पाटील यांना अस्वस्थ करणारा आहे.

तर बहीण म्हणून प्राणिताताई याना व कार्यकत्या साठीही चिंतेचा विषय असतो.. .खा चिखलीकर हे मतदारसंघात असो की मुंबई – पुणे- दिल्ली येथे गेल्यावर काळजी अधिक वाढते त्यातच जवळच्या कार्यकर्त्यांना कोरोना झाल्याचे कळताच अख्ख कुटुंब काळजीत पडतं.प्रवीण पाटील यांच्या रिपोर्ट नंतर सौ प्रतिभाताई चिखलीकर व सर्व जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. खा प्रतापराव पाटील यांना काही प्रमाणात धीर आला. प्रवीण पाटील यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार होत आहेत.

Read More  लॉकडाऊनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत वाढ; नवीन नियमावली केली जारी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या