हदगाव :-आजच्या डिजिटल युगात श्रीमंत पालक आपल्या मुलावर शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहेत. पण ग्रामीण भागातील पाच दहा घरे असलेल्या बामणी फाटा येथुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चगव्हान लगत असलेल्या मौजे खामगव्हाण येथील दिड एकर कोरडवाहू शेतीत काम करणारे लक्ष्मण हुंबे सततच्या नापिकीमुळे अडचणीचा सामना करीत आहेत.
मुलगी पृथ्वी चिंचगव्हाण येथे कै.कोंडाबाई व्यवहारे या शाळेत शिक्षण घेतले
दहावी मध्ये ९३ टक्के गुण घेत यशाचे शिखर गाठले
पृथ्वीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बरडशेवाळा शालेय शिक्षण समिती व गावक-यांच्या वतीने बरडशेवाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिचा सन्मान करण्यात आला.
मला पुढे शिकायचं पण परीस्थिती आड : पृथ्वी हुंबे
पृथ्वीने मला शिकुन खुप मोठे व्हायचे पण घरची परिस्थिती आड येत असल्याचे सांगत नांदेड जिल्ह्यातील अनेक गरजु कुटुंबासाठी मदतीसाठी पुढे येण्या-या नांदेड येथील साईप्रसाद परीवारासह दानशूर व्यक्ती सामाजिक संस्थेकडे अपेक्षा व्यक्त करीत माझ्या आईच्या हदगाव येथील महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखेच्या 80050552445 हा खाते नंबर वर IFSC कोड 0004142 मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.