32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडमाहूर येथे विना परवानगी मिरवणूक ; गुन्हा दाखल

माहूर येथे विना परवानगी मिरवणूक ; गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

माहूर : शहरातून सोनापीरबाबा दर्गा उत्सवानिमित्त ५ मार्च रोजी मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असुन ४०० ते ५०० जणांचा जमाव जमवुन , डिजे वाजवुन शासनाचे नियम तोडले. या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अख्खा महाराष्ट्र त्रस्त असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमासह सर्वच धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध घातले आहेत.परंतु दि.5 मार्चच्या रात्रीला ९-३० ते ११च्या दरम्यान माहूर शहरातील सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या सोनापीर बाबा दर्गा परिसरात संगनमत करून स.मोहसीन स.कमरोद्दीन, शे.इरफान शे.ताजु,शे.इम्रान शे.रफिक,फिरोजखान इसाकखान या आरोपीनी संगनमताने मास्क न लावता व सुरक्षित अंतर न बाळगता ४०० ते ५०० लोकांची गर्दी जमविली आणि डीजे वाजवून संदल काढल्याने जिल्हाधिका-यांच्या आदेशाच्या अटी व शथीर्चा भंग केल्या प्रकरणी न.पं.चे सहाय्यक अधीक्षक सुनील वाघ यांच्या तक्रारीवरून माहूर पोलीसांनी भा.द.वि.(मुंबई पोलीस कायदा )चे कलम १३५,(२,३,४ ),१८८,२६९,२७० नुसार दि.९ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तसेच शासन/ प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी सोनापीर बाबा दगार्चे मुजावर फकीर मोहम्मद शे.चाँद यांनी प्रतिवर्षी 5 मार्च ते 10 मार्च या कालावधीत साजरा केल्या जाणारा उर्स महोत्सव यावर्षी उत्सव समितीने रद्द केल्या बाबत प्रशासनाला लेखी स्वरूपात कळविले होते.तसेच उर्स महोत्सव रद्द केल्याने भाविकांनी येऊ नये असे आवाहनही प्रसार माध्यमांतून केले होते.

उत्सव समितीच्या वतीने फक्त दर्गा परिसरातच संदल काढण्यात येतो,निर्बंध घातलेल्या वाद्यानिशी शहरातून संदल काढून धुडगुस घालणा-या मंडळीवर प्रशासनानेच लगाम लावावा अशी लेखी विनंती दोन वषार्पूर्वी आम्ही केली होती. अशी माहिती मुजावर फकीर मोहम्मद शे.चाँद यांनी दिली. सदर प्रकरणी पो.नि.नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि.मद्दे हे पुढील तपास करीत आहेत. आम्ही संबंधीता विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.भविष्यात असा पेच निर्माण होणार नाही,त्याची काळजी घेतली जाईल.उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांनी पत्रकारांना खात्री दिली.

कोकणवासियांसाठी मुंबईत जाण्यास पर्यायी मार्गाची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या