लोहा / प्रतिनिधी
लोहा येथील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा विद्यमान
वाणिज्य विभागाचे प्रमुख विद्यार्थी प्रिय प्राध्यापक डॉ. डि. एम. पवार सर यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा लोहा येथे लोहा शहरांच्या पंरपंरेनुसार मित्र परिवारांनी खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटमवार, उपनगराध्यक्ष दत्ता भाऊ वाले, , माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , माजी नगरसेवक आप्पाराव पाटील पवार, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, चेअरमन मारोतराव पाटील बोरगावकर , शिवसेना प्रमुख सुरेश पाटील हिलाल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, नगरसेवक भास्कर पवार, बाळु पाटील पवार, बापु सावकार कोटलवार, , दिपक रुद्रवार , लुगारे सर , मु.अ. मुर्तुज शेख, परसराम कदम, परसराम कदम ,बाबा शेख आदी मित्रपरिवार उपस्थित होता.