हदगांव – मराठवाडा व विदर्भाच्या भुमीमध्ये हदगाव तालुक्यातील शौर्य भुमी असलेल्या नाव्हा येथे आद्य क्रांतिवीर नोवसाजी नाईक व त्यांच्या शुरविर सहका-यांनी इंग्रज व निजाम सैन्यासोबत लढा दिला होता.31 जानेवारी 2023 रोजी या लढ्याला 204 वर्ष पूर्ण झाली आहेत.
स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढ्यात विरमरण आलेल्या शुर विरांना अभीवादन करण्यासाठी हदगांव तालुक्यातील शोर्य भुमी असलेल्या मौजे नाव्हा येथे रविवार बारा फेब्रुवारी रोजी बारा वाजता स्मृती सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंशज श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर राहाणार असुन विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार माधवराव जवळगावकर, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार प्रज्ञा राजीव सातव,
आमदार संतोष बांगर, माजी खासदार सुर्यकांता पाटील , माजी खासदार शिवाजीराव माने, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार संतोष टारफे, सचीन नाईक, सुरेशराव महारनवार, शिवीदास बिडगर, अँड शिवाजीराव हाके, हरीभाऊ शेळके , शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या सह नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्यातील विविध पक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असुन व्याख्याते म्हणून प्राध्यापक डॉ यशपाल भिंगे यांची उपस्थिती राहणार आहे. स्वातंत्र्य प्रेमी सह आजुबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोहळा समितीच्या वतीने केले आहे.