37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडजिल्हाधिकारी डॉ.विपीन यांची तत्परता; अपघातग्रस्त युवकास दिले जीवदान

जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांची तत्परता; अपघातग्रस्त युवकास दिले जीवदान

एकमत ऑनलाईन

नांदेड : मोठे अधिकारी असल्याचा कधीही बडेजाव न आणता कोरोनाच्या संकट काळासह सदैव नांदेडकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणारे अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांची ओळख झाली आहे.अशा या कर्तव्यदक्ष अधिका-यांने विष्णुपूरीजवळ अपघात होऊन गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका युवकास पाहताच तत्काळ त्यास अन्य एका वाहनातून शासकीय रूग्णालात दाखल करून माणुसकीचे दर्शन दिले.डॉ.विपीन यांनी दाखविलेल्या तत्परतेने या युवकास जीवदान मिळाले आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.विपीन यांनी साधारणता वर्षभरापुर्वी पदभार घेतला. तोच काही दिवसांनी कोरोनाचे संकट सुरू झाले.जगभरात धुमाकुळ घालणा-या कोरोनाने नांदेडकरांचीही झोप उडवून टाकली होती.सर्वंच जण चिंतेत होतेक़ाही दिवस उलटताच शासन स्तराहून लॉकडाऊन जाहीर झाले. ऐन कोरानाच्या आणि विशेषता लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकारी म्हणून सर्वसामान्य नागरिकांसह नांदेड जिल्हयाच्या सुरक्षतेसाठी प्राधान्य दिले. मोठे शासकीय अधिकारी म्हटले अनेक वेळा नागरिकांना बडेजावपणाचा अनुभव येत असतो.परंतू केवळ कर्तव्यास प्राधान्य देत रस्त्यावर स्वत: उतरून डॉ.विपीन यांनी काम केले.

यामुळे त्यांच्या कामात बडेजावपणा दिसला नाही.म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांवर त्यांच्या कामाची छाप पडली आहे.पुन्हा एकदा अपघात ग्रस्त व्यक्तिस मदत करून माणुसकी दाखवली आहे.जिल्हाधिकारी डॉ.विपीन व तहसीलदार किरण अंबेकर यांच्यासह अन्य काही अधिकारी शासकीय कामानिमित्त सोमवारी सांयकाळी साडे सहाच्या सुमारास शासकीय वाहनाने विष्णुपूरी मार्गाने जात होते.त्यावेळी रस्त्या शेजारी गर्दी जमल्याचे दिसून आहे.तेव्हा कसलाही विचार न करता डॉ.विपीन यांनी स्वत: आपल्या वाहनातून उतरून पाहिले तेव्हा दुचाकीचा अपघात होऊन एक युवक गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसून आले.तर गर्दीतील लोक केवळ पाहत होते.यावेळी तत्काळ डॉ.विपीन यांनी अन्य एका वाहनाची व्यवस्था करित जखमीस विष्णुपूरीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले.उपचाराअंती या युवकास जीवदान मिळाले आहे.दरम्यान हा जखमीची ओळख पटली असून उद्धव गंगाराम कोंडले वाडे वय ३५ रा. मोकलेवाडी ता. कंधार येथील रहिवाशी असल्याचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी सांगीतले.

जिल्हाधिकारी मुगळीकर कारवाईसाठी उतरले रस्त्यावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या