29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home नांदेड धर्माबाद येथील मालमत्ता करमुल्यांकनचे प्रस्ताव धुळखात, पालिकेचा करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी

धर्माबाद येथील मालमत्ता करमुल्यांकनचे प्रस्ताव धुळखात, पालिकेचा करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी

एकमत ऑनलाईन

धर्माबाद (माधव हानमंते) येथील नगरपरीषदेच्या क्षेत्रातील मालमत्तेचे रिव्हिजन सन १९८-९९ मध्ये झाले आहे.परंतु दर चार वर्षांला मालमत्तेचे रिव्हिजन करणे आवश्यक आहे.परंतु पालिका प्रशासन व नगराध्यक्षांच्या हलगर्जीपणामुळे पालिकेचा आजपर्यंत करोडो रुपयांचा महसूल बुडाला असल्यामुळे दोषी असलेल्या संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील नगरपरीषदेच्या क्षेत्रातील मालमत्तेचे रिव्हिजन सन १९९८-९९ मध्ये करण्यात आले आहे.परंतु मालमत्तेचे रिव्हिजन होऊन २२ वर्ष उलटले आहेत.दरम्यानच्या काळात नगरपरीषदेच्या क्षेत्रात नागरीकांनी राहण्यासाठी व व्यापारासाठी शेकडो मालकी मालमत्तेवर बांधकाम परवानगी घेऊन बांधकामे केले आहेत.व शहरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकामे सुध्दा करण्यात आले आहे.परंतु सदरील अनाधिकृत केलेल्या बांधकामांची नोंद पालिकेतील रिव्हिजन रजीस्टरवर नसल्यामुळे पालिकेचा दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.

परंतु सदरील प्ररकरणाकडे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहेत.तसेच नियमानुसार घेतलेल्या बांधकाम परवानगी पेक्षा दुप्पट व तिप्पट अनाधिकृत बांधकामे झालेले आहेत.परंतु सदरील झालेल्या भव्य दिव्य बांधकामाची नोंद पालिकेच्या रिव्हिजन रजीस्टरवर नसून रिव्हिजन रजीस्टरवर आजही प्लाटची नोंद असल्याचे उघडकीस आले असून पालिकेचे कर्मचारी मात्र आजही गेल्या अनेक वर्षांपासून प्लाटचे ठराविक कर वसुल करीत असल्याचे उघडकीस आले आहे.सदरील प्ररकरणामुळे दरवर्षी पालिकेचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.परंतु याकडे पालिकेचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,नगरसेवक, मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी दुर्लक्ष कशासाठी करीत असल्याची चर्चा शहरातील जनतेत होत आहे.

तात्कालीयन नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या कार्यकाळात शहरातील मालमत्तेचे रिव्हिजन करण्यासाठी नियमानुसार एका खाजगी संस्थेकडे काम देण्यात आले होते.सदरील संस्थेचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी शहरातील मालमत्तेचे फेरमूल्यांकनही केले आहे.मालमत्तेच्या केलेल्या मुल्यांकनाप्रमाणे दरवर्षी कर वसुल करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू होणार होती.सदरील कामावर पालिकेचे लाखों रुपय खर्च झाले आहेत.परंतु मालमत्तेचे रिव्हिजनचे काम सदरील संस्थेने अर्धवट केल्यामुळे पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च होऊनही काही फायदा झाला नाही.त्यामुळे पालिकेचा दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.

तसेच नगराध्यक्षा श्रीमती अफजल बेगम अब्दूल सत्तार ह्या निवडूण आल्यापासून शहरातील मालमत्तेचे रिव्हिजन करण्यासाठी कुठलीच हालचाल केली नसल्याचे चर्चा शहरातील जनतेत होत आहे.उलट त्यांच्या कार्यकाळात शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकामे झालेली आहेत.परंतु याचा फायदा नगरपरीषदेला होत नाही.तसेच नगराध्यक्षा श्रीमती अफजल बेगम अब्दूल सत्तार, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी व सर्व नगरसेवकांच्या अंतर्गत वादामुळे शहराचा विकास रखडला आहे.तसेच पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या हलगर्जीपणामुळे पालिकेचा सन २००३ व २००४ पासून दर्वषी करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.त्यामुळे सदरील प्ररकरणाकडे मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांनी लक्ष देऊन पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी काय नियोजन करतील,याकडे शहरातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

यासंदर्भात उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांना विचार पुस केल्यास म्हणाले की,सन २०१४ व २०१५ मध्ये माझ्या कालावधीत शहरातील मालमत्तेचे रिव्हिजन करण्यासाठी नियमानुसार एका खाजगी संस्थेला काम देण्यात आले होते.सदरील कामावर लाखो रुपये खर्च सुध्दा झालेले आहेत.परंतु काम अर्धवटच झालेला असून संबंधित संस्थेला काम सुरू करण्यासाठी नियमानुसार नोटीस देण्यात आली होती.परंतु आता सदरील मालमत्तेचे रिव्हिजनचे काम सुरू करण्यासाठी लवकरच एक विशेष सभा घेऊन संबधित संस्थेवर कायदेशीर कारवाई करणार असून आता शासनच सिटी सर्व्हेचे काम हाती घेणार असल्याचे दै.एकमतशी बोलताना सांगितले आहे.

परंतु पालिकेचा दरवर्षी करडो रुपयांचा महसूल बुडाला असून एकूण आजपर्यंत किती महसूल बुडाला याचा अंदाज लावणेही आवघड आहे.गेल्या तीन वर्षांपासून शहराचा विकास तर रखडलाच आहे.यासोबत पालिकेचा करोडो रुपयांचा महसूलही बुडाला आहे.त्यामुळे सदरील प्ररकरणाकडे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी लक्ष देण्याची मागणी शहरातील जनतेतून होत आहे.

गुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या