36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeनांदेडबिलोली घटनेच्या निषेधार्थ : कंधारच्या तहसीलवर आक्रोष मोर्चा

बिलोली घटनेच्या निषेधार्थ : कंधारच्या तहसीलवर आक्रोष मोर्चा

एकमत ऑनलाईन

कंधार : बिलोली शहरात एका मातंग समाजाच्या गरीब/मुकबधीर दिव्यांग मुलीवर दोन ते तीन नराधमांनी अन्याय व बलात्कार करुन खुन केला. अशा सवार्चा तपास करुन आरोपीना तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी दि. १४ डिसेंबर रोजी अण्णाभाऊ साठे पुतळा ते महाराणा प्रताप चौक दरम्यान रास्ता रोको करण्यात आला.व कंधार तहसिलवर आक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

दि.१४ रोजी झालेल्या रास्ता रोकोचे रुपांतर आक्रोश मोर्चात झाले व हा प्रंचड जनसमुदायाचा आक्रोश मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकला आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व मामा मित्रमंडळ व जाहीर पाठींबा दिलेल्या विविध संघटनेच्या पदाधिका-यांनी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना निवेदन देवून शासनास मातंग समाजाची भावना तात्काळ कळवावी व मातंग समाजातील मुकबधीर मुलीवर बिलोली येथे बालात्कार करुन पुरावा नस्ट करण्यासाठी तिचा निघृन खुन करणा-ाा ख-या आरोपीचा शोध घेवुन तात्काळ फाशी देण्यात यावी आशी मागील निवेदनाद्वारे करण्यात आली.

सदरील घटना अंत्यत निंदनीय आणि घृणास्पद असुन आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच सदर प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन समाजात अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी म्हणुन पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे यासाठी कंधार शहरात सदरील रास्ता रोको व आक्रोश मोर्चा होता असे मारोती मामा मित्रमंडळाचे संस्थापक मारोती मामा गायकवाड यानी यावेळी प्रतिक्रिया देवुन बिलोली प्रकरणातील पिडीता मुलींच्या एकमेव कुटूंबातील सदस्य बहीणीस बिलोली नगरपालीकेत नौकरी देण्यात यावी असे आवाहन केले .

 

आवताडे कंपनीवर कारवाईसाठी शेतक-यांचे उपोषण

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या