37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडकंधारमध्ये केंद्र सरकार विरोधात निदर्शने

कंधारमध्ये केंद्र सरकार विरोधात निदर्शने

एकमत ऑनलाईन

कंधार (विश्वंभर बसवंते) : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात कंधारात महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले.यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सह आंदोलनाला पाठींबा असणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी ११ वाजता शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानक पासून महाराणा प्रताप चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट शिवाजी महाराज चौकातून गांधी चौक मार्गे चौकातून निदर्शन करत मार्केट बंदचे आवाहन करण्यात आले या बंदला शंभरटक्के प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारने जाचक असलेला शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी महाविकास आघाडीच्या व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कंधार बंदची हाक देण्यात आली आहे. जाचक कायदा रद्द करावा, केंद्र सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी कंधार शहर दुमदुमून गेले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी , शिवसेनेचे तालुकाध्यक्ष धनराज लुंगारे , काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, नगरसेवक मन्नान चौधरी, हमिद सुलेमान, रामचंद्र येईलवाड,पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण,शेख शेरुभाई, कॉंग्रेसचे सतिश देवकत्ते, सुरेश कल्हाळीकर, वंचिताचे नेते प्रेमानंद गायकवाड बंटी,अभिजित कंधारकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे अंगत केंद्रे माधव मुसळे,एम. आय. एम तालुकाध्यक्ष शेख हामिद,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

फुलवळ
केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात ता. ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंद च्या समर्थनार्थ कंधार तालुक्यातील फुलवळ येथे स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कांहीं काळ मार्केट व रस्ता बंद करून करून घोषणाबाजी करत सौम्य आंदोलन करण्यात आले. सकाळी ठीक १० वाजता येथील ग्रामस्थ व शेतकरी पुत्र एकत्रित येऊन मार्केट मधील सर्व दुकानदारांना भेटून विनंतीपूर्वक साथ मागत जगाच्या पोशिंद्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद ला समर्थन देण्यासाठी आपण आपापली दुकाने , प्रतिष्ठाने काही वेळा करिता बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती केली असता येथील सर्व दुकानदारांनी प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद केली आणि बंद मध्ये सामील झाले.

मार्केट तर बंद झाले पण वाहन चालूच होती त्यामुळे रस्त्यावरील वाहनेही बंद झाले पाहिजेत यासाठी मुख्य रस्त्यावर टायर जाळून काही काळ वाहनेही बंद ठेवण्यात आले होती. येथील बंद ला कुठलेही हिंसक वळण लागूनये याची खबरदारी घेण्यासाठी कंधार पोलीस ठाण्याचे API एस यु जाधव , PSI राजलींग सातानुरे , बिट जमादार गोंटे यांच्या अन्य कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तात्काळ फुलवळ येथे दाखल झाला होता परंतु ते येथे पोहचण्यापूर्वीच येथील आंदोलनकर्त्यांनी शांततेत घोषणाबाजी करून बंद संपुष्टात आणला व वाहने सुरळीत चालू करून दिली , तसेच मार्केट मधील दुकानेही उघडण्यात आली.

राजू शेट्टींकडून कृषी कायद्यांची होळी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या