22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeनांदेडवाढीव वीज दर रद्द करुन २०० युनिट पर्यंत मोफत वीज द्या ;...

वाढीव वीज दर रद्द करुन २०० युनिट पर्यंत मोफत वीज द्या ; आम आदमी पार्टी

एकमत ऑनलाईन

कंधार : वाढीव वीज दर रद्द करणे, शिवसेनेच्या वचननाम्या प्रमाणे ३०० युनिट ३० % दर कमी करणे, आणि २०० युनिट मोफत देण्याबाबत आम आदमी पार्टीच्या वतीने कंधार तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता आपले सरकार आल्याबरोबार आपणही २०% पर्यंत या महिण्यापासून भाव वाढ केली आहे.राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी.

आपण शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी वीज कंपन्यांचे उअॠ ऑडीट करण्यात यावे, राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी.

अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर साईनाथ मळगे तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी,कंधार, तिरुपती इंगळे तालुका उपाध्यक्ष, नितीन भोसीकर, तालुका सचिव, विठ्ठल देवकांबळे, रेणुकादास भिसे, प्रकाश नवघरे, मोनित गायकवाड, सोमेश इंगळे, अविनाश जोंधळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या