25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeनांदेडवाळकी शिवारातील पिकांचे सरसकट पंचनामे करावे

वाळकी शिवारातील पिकांचे सरसकट पंचनामे करावे

एकमत ऑनलाईन

हदगाव : तालुक्यातील मौजे वाळकी खुर्द परिसरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या सर्वच शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला सोयाबीन, कापूस. तूर, उडीद इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व आमदार माधवराव पाटील जवळगाकर यांनी पीक नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि लगेच नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याचे आदेशीत केले दोन ते तीन दिवसापासून वाळकी शिवारात पिकांची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत परंतु पंचनामे करताना तलाठी व कृषी सहाय्यक यांनी दुजाभाव केल्याचे निवेदन वाळकी येथील दहा ते बारा शेतकऱ्यांनी तहसीलदार जीवराज दापकर यांना दिले आहे.

पुढे निवेदनात असे म्हटले आहे की पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पिकाच्या नुकसानी नुसार सर्व्हे घेतला नसल्याने आम्ही पीक नुकसानग्रस्त शेतकरी कालांतराने मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या मोबदल्या पासुन वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुनश्च पीक नुकसानी नुसार सर्व्हे घ्यावा अशी मागणी वाळकी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

गुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या