27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडमोटेगावकर, शांभवीसह अन्य दोघांवर दंडात्मक कारवाई

मोटेगावकर, शांभवीसह अन्य दोघांवर दंडात्मक कारवाई

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
देशभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे नांदेड जिल्ह्यातही कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी नुकतेच जिल्ह्यासाठी नवीन निर्बंध लागु केले आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत बिनदिक्कतपणे कोचिंग क्लासेस सुरु ठेवल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त होताच आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजितपालसिंग संधू यांनी आपल्या टीमसह शहरातील कोचिंग क्लासेसवर गुरुवारी दुपारी धाडी टाकल्या यावेळी क्लासेसमध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत मोटेगावकर, शांभवी, दरक, सलगरे या चार कोचिंग क्लासेसवर कारवाई करत ९५ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.

राज्यासह नांदेड जिल्हयात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.दररोज शंभर ते दोनशे रूग्णांची भर पडत आहे.यामुळे जिल्हयाची कोरोनाच्या तिस-या लाटेकडे वाटचाल होत आहे.दोन दिवसापुर्वी १७४ रूग्णांचा आकडा बुधवारी स्फोट होऊन एकदम ४७४ वर गेला आहे.दिवसेनदिवस गंभीर होणारी परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी बुधवारी सायंकाळीच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नांदेड जिल्हयासाठी नवे निर्बंध लागू केले आहेत.यात पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समुहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत बंदी केली आहे.
शासकीय कार्यालयात महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना अभ्‍यांगतांवर / आगंतुकांवर बंदी घातली आहे.

सोबत्च लग्नसमारंभसाठी अंत्यविधीसाठी, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम लग्नसमारंभासाठी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम कमाल ५० व्यक्ती. अंत्यविधीसाठी कमाल २० व्यक्तीस परवानगी दिली आहे.तर सर्वाच महत्वाचे म्हणजे शाळा,कॉलेज व सर्व कोचिंग क्लासेस काही महत्वाच्या बाबी वगळता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.मात्र हे आदेश दुस-याच दिवशी गुरूवारी पायदळी तुडवून शामनगर भागातील काही क्लासचालक विद्यार्थ्यांची तुडूंब गर्दी करून क्लासेस घेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.नागरिकांसह काही पालकांच्या याबाबत तक्रारी मिळताच महापालिकेच्या पथकाने येथील मोटेगावकर यांचे आरसीसी कोचिंग क्लासेसची झाडाझडती घेतली.

त्यावेळी आरसीसीच्या इमारतीमधील एका हॉलमध्ये असंख्य विद्यार्थी अंतर न ठेवता एकमेकांना चिटकून बसविण्यात आले होते तर एका बाकावर चार ते पाच विद्यार्थी विनामास्क बसल्याचे यावेळी दिसून आले.तर शेजारी असलेल्या शांभवीस क्लासेस,दरक क्लासेस,सलगरे क्लासेसमध्ये अनेक विद्यार्थी खचाखच भरल्याचे महापालिकेच्या पथकाला आढळून आले. जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणा-या या चार ही कोचिंग क्लासेसचालकांना ९५ हजार रूपयांचा दंड लावण्यात आला.यात आरसीसीला ५० हजार,शांभवीला २५ हजार,दरकला १० हजार तर सलगरेवर १० हजार अशी दंडात्मक कारवाई करून महापालिका पथकाने दणका दिला आहे.मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने,अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे,गिरीष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंग संधु,क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव,डॉ.मिर्झा बेग,रमेश चवरे,डॉ.रईसोद्दीन,रावण सोनवळे,अविनाश अटकोरे,सहा.आयुक्त सुधीर इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या