23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडगोवर्धनघाटाजवळ तराफे अवतरले; अवैध वाळू उपसा जोमात

गोवर्धनघाटाजवळ तराफे अवतरले; अवैध वाळू उपसा जोमात

एकमत ऑनलाईन

नांदेड : पाऊस थांबताच गोवर्धन घाटाजवळील गोदावरी नदीत अवैद्य वाळू उपसा करणारे असंख्य तराफे पुन्हा अवतरले आहेत.अशाच पद्धतीने अन्य काही ठिकाणी वाळू उपसा होत आहे.महसुल विभागाकडून केवळ पुढचे पाठ मागचे सपाट अशी कारवाई होत असल्याचे वाळू माफियांचे चांगभले होत आहे. नांदेड जिल्हयात जुलै महिन्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.त्यात जिल्हयासह विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे विष्णुपूरी प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले. भावसाने लावलेली हजेरी वाळू माफियांसाठी वरदानच ठरली.

कारण जेवढे जास्त पाणी विष्णुपूरी प्रकल्पातून सोडले जाते. तेवढ्याच चांगल्या पध्दतीने वाळू घाट भरत असतात. अवैध प्रकारारे वाळू उत्खनन करून त्याची विक्री करण्यात पटाईत असणा-या वाळू माफियांना जुलै महिन्यात झालेल्या पावसाने पुन्हा अच्छे दिन आणले आहेत. पाऊस थांबताच गेल्या काही दिवसापासून गोवर्धन घाटाजवळील गोदावरी नदी पात्रातून मोठया प्रमाणात अवैध वाळू सुरू झाला आहे.वाळू उपसा करणारे असंख्य तराफे सध्या नदी पात्रात तरंगत आहेत.अवैध वाळू उपसा करणा-यांवर महसुल विभागाची कारवाई म्हणजे पुढेचे पाठ मागचे सपाट असेच होत आहे.यामुळे अवैध वाळू उपसाला बळ मिळत आहे. विष्णुपूरी प्रकल्पाच्या वरच्या भागात भरपूर पाऊस पडत आहे त्यामुळे विष्णुपूरीत येणारा पाणी साठा वाढतच होता.

विष्णुपूरीच्या वरच्या भागातून येणा-या पाण्यामुळे जिल्ह्यातील वरच्या भागातील वाळू घाट सुध्दा भरले आहेत. आणि विष्णुपूरी धरणाचा पाणी साठा वाढल्यामुळे त्यातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या खालच्या भागातील रिकामी झालेली वाळू पुन्हा भरली आहे. शहरातील गोवर्धनघाट पुलाखाली तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याचे काही दिवपासून दिसून येत आहे.विष्णुपूरी प्रकल्पाच्या मागील भागात सुध्दा वाळू साठा वाढला असून त्याचा ही उपसा सुरू झाला आहे.

संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज पालख्यांचे स्वागत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या