24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeनांदेडहदगावच्या पऊळ नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंग

हदगावच्या पऊळ नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंग

एकमत ऑनलाईन

हदगाव : शहरापासूम अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बनचिंचोली रोडवरील गोविंदराव पऊळ नर्सीग कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीसह आरोपी शिक्षक भगीरथ शिंदेसह ईतर तीन विद्यार्थींनीवर रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की,हदगाव तालुक्यातील मौजे चिकाळा येथील विद्यार्थ्यांनीने बरचिंचोली येथील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वषार्साठी आठ दिवसापूर्वी प्रेवश घेतला होता.यानंतर त्याच ठिकाणी मुलींचे वसतिगृह असल्याने त्या तिघी जणी तेथेच राहू लागल्या होत्या.दि. १२ सप्टेंबर रोजी नर्सिंग कॉलेजमधील वरिष्ठ तीन विद्यार्थ्यांनीने छेडछाड करून कपडे काढ, नाक घास,झाडूमार अश्या प्रकारची रॅगिंग केली. झालेला हा सर्व गंभीर प्रकार तिने शिक्षक भगीरथ शिंदे यांना सांगितला परंतु त्यांनी सुद्धा वाईट उद्देशाने नको त्या भागाचा स्पर्श केला व तू अन्य जातीची आहेस.

तू हे प्रकरण कुणाला जरी सांगितले तर तुझ्या शिक्षणाचे नुकसान करतो असे म्हणून जातीय भावनेतून कृत्य केले. असे म्हणणे आहे. यानंतर फिर्यादी विद्यार्थीं तिथुन निघून गेली आणि आपल्या सोबत झालेला सर्व प्रकार तिने आपल्या वडीलाला सांगितला. वडीलाने आपल्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले. मुलीच्या तक्रारीवरून आरोपी भगीरथ शिंदे व ईतर तीन विद्यार्थ्यांनीवर हदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर राजनकर करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या