27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home नांदेड कसिनो जुगार अड्ड्यावर धाड

कसिनो जुगार अड्ड्यावर धाड

एकमत ऑनलाईन

माहूर : भर चौकात खुलेआम सुरू असलेल्या ऑनलाइन कसिनो जुगार अड्ड्यावर सिंदखेड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अचानक धाड टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले.या कारवाईत संगणक संच व रोख असा मुद्देमाल जप्त केला. वाई बाजारला सध्या मटका बाजार या नावाने ओळखले जाऊ लागले आहेत. कारण येथील आठवडी बाजार चौकात केवळ मटका मुख्य व्यवसाय झाला आहे. लगतच्या खेड्यापाड्यातून मोलमजुरी करणारे झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापोटी वाई बाजारला येऊन मुंबई,कल्याण,मिलन डे या पारंपारिक मटका जुगार खेळत होते.

त्यात आता संगणकावर ऑनलाइन कसिनो फन टारगेट नावाचा मटका पेक्षाही कमी वेळात निकाल देणारा जुगार खेळविला जात आहे. ज्याला राज्य शासनाच्या अर्थ मंत्रालयातील ऑनलाईन लॉटरी विभागाची कुठलीच मान्यता नाही. या ऑनलाईन कसिनोचा आकडा तिथे बसलेला गॅम्बलर काढतो. त्यामुळे यावर पैसे लावणारे झटपट श्रीमंत होण्या ऐवजी झटपट कंगाल होत आहेत. मागील अनेक महिन्यापासून खुलेआम सुरू असलेल्या या जुगारावर बुधवारी सायंकाळी सिंदखेड पोलिसांनी खाजगी गाडी घेऊन साध्या वेशात धाड घातली असता जुगार खेळणारे व खेळविणारे असे एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले.

त्याच्याकडील संगणक संच व रोख असा एकूण १७ हजार चारशे रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करून जुगा-याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करून तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दारासिंग चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. सिंदखेड पोलिसांनी ठाणे अंतर्गत क्षेत्रात अवैध व्यवसायिकांवर सातत्याने होत असलेल्या कारवायांची श्रुखला पाहता मटका गुटका जुगार व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. काही दिवसापुर्वी पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करून गुटखा माफियांना दणका दिला होता.

 

कृषि कायदे स्वागतार्ह पण शेतक-यांना सुरक्षाही द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या