22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडमांडवी येथे जुगार अड्डयावर धाड, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मांडवी येथे जुगार अड्डयावर धाड, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

मांडवी (प्रतिनिधी) : मांडवी येथील एका बारवर झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व मांडवी पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करून मांडवी पोलिस ठाण्यात ३२ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी दि २३ मे रोजी येथील नंद बारमध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा क्लब चालू असल्याचा गुप्त माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व मांडवी पोलिसांनी संयुक्त धाड टाकली. तेथे ३१ लोक तीन टेबलावर वेगवेगळ्या ठिकाणी जुगार पैसे लावून खेळत असल्याचे दिसून आले. त्यांच्या कडून रोख रक्कम १ लाख ४६ हजार २२० रुपये व २२ लाख ५१ हजार ५०० रुपये साहित्यासह सहा कार व

जुगाराचे साहित्य असे एकुण २३ लाख ३१ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ३२ लोकांवर मांडवी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला. ही कार्यवाही स्थागुशाचे पोहेकॉ. उदय राठोड, पोहेकॉ. शेख चाँद, पोहेकॉ.सुरेश घुगे व मांडवी पोलिस ठाण्याचे सपोनि मल्हार शिवरकर, पोउपनी शिवप्रसाद कराळे, पोउपनी पठाण, मडावी, कोडमवार, चुनाडे, मोहूर्ले, जाधव आदींनी केली.

क्लबमध्ये तेलंगणातील लोक महागडी चारचाकी वाहनातून दूरवरून जुगार खेळण्यासाठी मांडवी येथे येतात. क्लबमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. धाडीत तुटपुंजी रोख रक्कम दाखवल्याने लोकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या