23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeनांदेडजारीकोट शिवारातील जुगारावर छापा

जारीकोट शिवारातील जुगारावर छापा

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : धर्माबाद तालुक्यातील जारीकोट ते सायखेड रोडलगत शिवारातील पडीत शेतात अवैधरित्या तिर्रट नावाचा पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी धाड टाकून ७ आरोपींना ताब्यात घेतले. तर १२ आरोपी फरार झाले. आरोपींकडून जुगाराचे साहित्य, दोन मोटारसायकल व नगदी ३० हजार १०० रुपये असा एकूण ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना सोमवारी (ता.२७) रोजी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान घडली.

आरोपी नंदकुमार नारायण कामीनवार, धनंजय आनंदराव रामोड, गोविंद गंगाधर गंठोड, शिवकुमार गंगाधर गंठोड, ‍व्यंकट लक्ष्‍मण भोजराज (सर्वजण रा. जारीकोट), साईनाथ बाजीराव कदम (रा.चोळाखा), प्रमोद दत्ताहरी कदम (रा.चोंडी), तर फरार आरोपी नागेश विठ्ठल सुरेवाड, गणेश लिंगोजी मुपडे, मनोज सायलू रामोड, शिवाजी विठ्ठल मोकळे, माधव गंगाधर भोजराज, शेख फरीद, रमेश रामा कमलाकर, नरसिंग गंगाधर नरवाडे, मारोती दिगंबर उरेकर, साईनाथ लक्ष्मण उप्पोड, विलास साहेबराव कन्नेवाड ( सर्वजण रा. जारीकोट) हे जारीकोट ते सायखेड शिवारातील बालाजी पोशट्टी इसलवार यांच्या शेतालगत पडीत शेतात अवैधरित्या तिर्रट नावाचा पत्याचा जुगार खेळत होते. ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारावर एका खाजगी पिकअप वाहनाने जाऊन पोलिसांनी धाड टाकून ७ आरोपींना ताब्यात घेतले. तर १२ आरोपी फरार झाले. जुगार खेळणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली असता त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, दोन मोटारसायकल ज्यांची किंमत ५५ हजार रुपये व नगदी ३० हजार १०० रुपये असा एकूण ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या