23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडनांदेड शहरात पावसाची रात्री दमदार हजेरी... तर दिवसा भूरभुरी!

नांदेड शहरात पावसाची रात्री दमदार हजेरी… तर दिवसा भूरभुरी!

एकमत ऑनलाईन

नांदेड : बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊ स पडणार असल्याचा हवामानखात्याने अंदाज वर्तविला आहे. मराठवाडा आणि पुर्व विदर्भात जोरदार पाऊ स कोसळल्यानंतर पावसाने उघडीप दिली होती मात्र रविवारी रात्री नांदेड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली तर सोमवार सकाळपासून भुरभुरी पावसाला सुरुवात झाली. यानंतर दुपारी काहीवेळ पावसाचा जोर वाढला होता. गौरी पुजनाचे आगमन झाल्यानंतर पावसाची हजेरी लाभदायक ठरणार आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी भागात पावसाचा जोर अधिक प्रमाणात राहणार आहे. विशेषत: घाट परिसरात पावसाची हजेरी  जोरदार राहणार असल्याचे सांगितल्या जात आहे. नांदेड जिल्ह्याला यलो अलर्ट म्हणून जाहिर केले आहे. विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या ४८ तासात बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात चार दिवसात पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे हवामानखात्याकडून सांगण्यात आले.

रविवारी रात्री उशिरा नांदेड शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाच्या सरींमुळे अनेकांची तारांबळ उडाली. गौरी पुजनाच्या तयारीत असलेल्या नांदेडकरांना मात्र रविवारी रात्री पावसाचा चांगलाच दणका बसला. सोमवारी सकाळपासूनच आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले होते.काही वेळ रिमझिम पावसाने शहर परिसरात हजेरी लावली. यानंतर सूर्यदर्शन होवून दुपारी १२ नंतर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काहीवेळ वि….ती घेवून पावसाचा जोर वाढला होता. परंतु सायंकाळी ५ नंतर पाऊस थांबला होता. आकाशात ढग दाटून आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे.

इसापूर धरणाचे दोन दरवाजे उघडले
काही दिवसापुर्वी झालेल्या पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत होते. उर्ध्व पैनगंगा, इसापूर धरण १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ९८.१२ टक्के क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पानलोट क्षेत्रातून येणा-या पाण्यामुळे व पानलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने इसापूर

धरणाचे सोमवारी २ वक्र दरवाजे दुपारनंतर उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यांमधून पैनगंगा नदीपात्रात ३८९१२ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सदरील परिस्थिती लक्षात घेता इसापूर धरणाच्या खालच्या बाजूस असणा-या नदी काठच्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे, शेतीविषयक सामुग्री, जीवीताची, पशुधनाची, विटभट्टी साहित्य इतर कोणतीही हाणी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून इशारा
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने आज दिलेल्या सूचनेनुसार दि.१३ व १४ सप्टेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या