33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड राज ठाकरे: थोडा संयम आणि विश्वास ठेवा कारण मार्ग खडतर असला तरी...

राज ठाकरे: थोडा संयम आणि विश्वास ठेवा कारण मार्ग खडतर असला तरी ठाम आहे

एकमत ऑनलाईन

सुनिल ईरावार आत्महत्या : मनसेची भावनीक पोस्ट व्हिडिओतून तमाम मनसेसैनिकांना भावनिक साद

मुंबई : ‘अखेरचा जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे’ असं म्हणून नांदेडच्या मनसेचे शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने राज्यातील आपल्या तमाम कार्यकर्त्यांना धीर देण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील काही संवाद हा व्हिडिओ स्वरुपात अधिकृत सोशल अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओतून तमाम मनसेसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली आहे.

‘सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार आपल्याकडे आहे, फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवा कारण मार्ग खडतर असला तरी ठाम आहे’ असं भावनिक आवाहन मनसेकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.तसंच, ‘सुनील ईरावार सारख्या उमद्या महाराष्ट्र सैनिकास गमावणं, हे हेलावून टाकणारं आहे’ असं म्हणत मनसेकडून आपल्या कार्यकत्यार्ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.’ ऑगस्ट रोजी सुनील ईरावार या २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिल ईरावार हा शहरातील गोकुंदा परिसरात राहत होता.

सुनिल हा मनसेच्या शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होता. सकाळी साडे सहाच्या सुमारास सुनिलने राहत्या घरात साडीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिलने वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी जिवन यात्रा संपवली. सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.

‘अखेरचा जय महाराष्ट्र’

यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माज्या मर्जीप्रमाणे आयुष्य संपवत आहे. तरी माज्यामुळे कुणालाच त्रास देऊ नका. राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि दोन्हीही माज्याजवळ नाही.

जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे
आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पूदादा, मला माहिती आहे मी माफ करण्याचा लायकीचा नाही, तरी तुम्ही मला सर्वजण मला माफ करशाल अशी आशा बाळगतो.
आई मला माफ करं,
तुझाच सुनिल

सुनिलची सुसाईट नोट वाचून शहरातील मनसे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सुनिलने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर आज मनसेच्या वतीने ही कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्यात आली.

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार : एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या