26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडवंचित बहुजन आघाडी च्या वतीने विविध मागण्यासाठी कंधार मध्ये रास्ता रोको आंदोलन

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने विविध मागण्यासाठी कंधार मध्ये रास्ता रोको आंदोलन

एकमत ऑनलाईन

कंधार : (सय्यद हबीब) : वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कंधार लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको करून कंधार तहसील द्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंधार तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतात पाणीच पाणी झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे कंधार तालुका हा डोंगराळ व माळरान शेती चा भाग आहे परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या covid 19 महामारी मुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना तोंडाला आलेला पिकाचा घास हिसकावला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कंधार लोहा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल पूर्ण माफ करण्यात यावे, शेतक-यांच्या पीकांना सरसकट विमा लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकरी बांधवांना त्याच्या शेतात महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेची कामे उपलब्ध करुन त्यांना मंजुरी देण्यात यावी, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँका वर कारवाई करून शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्ज देण्यात यावे, शासनाने शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना भीमा शासकीय रकमेतून काढण्यात यावा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करत ही मागण्या मान्य कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन बहुजन आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला.

पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या