26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडसंभाजी ब्रिगेडचे कौठा येथे रास्तारोको

संभाजी ब्रिगेडचे कौठा येथे रास्तारोको

एकमत ऑनलाईन

कृष्णूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही स्पर्धात्मक परिक्षा घेऊनयेत या व इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने नांदेड ते हैद्राबाद रोडवर कौठा पाटीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड लोहा तालुक्याच्यावतीने करण्यात आले ले रास्ता रोको आंदोलन ११ एप्रिल रोजीची एमपिएससी परिक्षा पुढे ढकलावी,ओला दुष्काळ जाहीर करावाव ५०,०००रुपए नुकसान भरपाई द्यावी,पिकविमा मंजुर करावा,कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांच्या याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध करुन तात्काळ त्यांना पिककर्ज द्यावे,उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कार्यांना फिशीची शिक्षा द्यावी या मागण्यांसाठी होते.निसगार्ने शेतकर्यांकडे पाठ फिरवली मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याकारणाने शेतकर्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले जवळपास पंचनामे झाले आहेत शासनाने जलद गतीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना हेक्टरी ५०,०००रुपए नुकसानभरपाई द्यावी असे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी मत मांडले.

पिककर्ज माफ केले म्हणुन शासनाने पिककर्जाएवढे पैसे कर्जमाफीच्या जाहिरातीत घाटले पण आणखी काय कर्जमाफीच्या याद्याच पुर्ण आल्या नाहीत काही शेतकयार्चे माफ झाले तर काहीचे झाले नाही सरसकट पिककर्ज माफ करून नविन पिककर्ज लवकर द्यावे,तसेच पिकविमाही मंजुर करावा असे मत जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांनी व्यक्त केले,उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलातकार्यांना फाशीची शीक्षा द्यावी का तिचा अंतिमसंस्कार राञीच्या अंधारात कुटुंबांच्या अनुपस्थित का केला असा सवाल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाचा तिढा लवकरच सोडवावा व मराठा आरक्षण लागु होइपर्यंत एम पि एस सी सह इतर स्पर्धात्मप परिक्षा व नोकरभरती पुढे ढकलावी कारण सात एप्रिल रोजी होवु घातलेल्या परिक्षा शासनाने कोरोणामुळे पुढे ढकलल्या मग कोरोणा संपला नसतांनाही आरक्षणावर स्थगिती आल्याआल्याच का शासन परिक्षा घेण्याचे अट्टाहास करत आहे असी शंका लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील व्यक्त केली ते पुढे म्हणाले अकरा एप्रिल रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलावी अन्यथा आम्ही परिक्षा केंद्रावर आंदोलन करू आणि अशाप्रकारे मराठा समाजाच्या शेतकर्यांच्या मागण्यावर सरकार झोपीचे सोंग घेत असेल तर क्रांतीसिंह नाना पाटलांच्या भुमिकेतील प्रतिसरकार संभाजी ब्रिगेड स्थापन करेल असेही ते म्हणाले.

अंकुश कोल्हे सर्वांचे आभार मांडले.जय जिजाऊ जय शिवराय,मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे,हाथरस येथील बलात्कार्यांना फाशी झाली पाहिजे या घोषणांनी फरिसर दणाणुन गेला होता.यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.प्रचंड पोलिस बदोबस्तही या रास्तारोको साठी होता.यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे,जिल्हाध्यक्ष शाम पाटील,शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा मोरे,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,विधानसभा अध्यक्ष माधव घोरबांड,शंकर घोरबांड,आंकुश कोल्हे ,राम आन्नकाडे,प्रविण जाधव,दत्ता येवले,साईनाथ टर्के,बालाजी शिरसाठ,प्रविण शिरसाठ,प्रभाकर ढगे,सुनिल धुमाळ,परमेश्वर हंबर्डे,दशरथ डरंगे,परमेश्वर खोसे,माणिक हंबर्डे,विकास पांचाळ,भास्कर सोमवारे,दिगंबर ढगे,बळवंत बेटकर,शंकर जाधव,रावजी कदम,खंडु सावळे यांच्यासह हजारो शेतकरी समाजबांधव उपस्थित होते.

गोळ्या झाडल्यानंतर दगडाने ठेचून गुंडाचा खून; सांगलीत खळबळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या