24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडइटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दोन बहिणींची नोंद

इटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दोन बहिणींची नोंद

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : शहरातील किड्स या शाळेतील दोन सख्ख्या बहिणीने इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे त्यात कुमारी निशिता कमलजित चंडालिया वय वर्ष सहा व कुमारी मैथिली कमलजित चंडालिया वय वर्ष चार या दोन सख्या बहिणींनी रुबिक्स क्यूब सोडवण्याच्या खेळामध्ये सहभाग घेऊन अव्वल क्रमांक पटकावत इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसांपूर्वी रुबिक्स क्यूब या खेळांमध्ये भाग घेऊन कुमारी निशिता चंडालिया हिने लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली होती त्यानंतर आता नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा तिने आपल्या नावाची नोंद केली आहे त्यामुळे रुबिक्स क्यूब सोडून ही नोद केल्यामुळे हिमायतनगर शहरातील किड्स वर्ल्ड या शाळेतील दोन सख्ख्या बहिणींनी एक जागतिक विक्रम नोंदविला आहे त्याबद्दल रुबिक्स क्यूब यांच्याकडून तिला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मार्फत मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे त्या दोन बहिणीचे हिमायतनगर तालुक्यासह परिसरातून कौतुक होत आहे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या