21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeनांदेडसा.बां.विभागाच्या कामाची लिम्का बुकमध्ये नोंद; २४ तासांत ३९.६९ किमीच्या बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे...

सा.बां.विभागाच्या कामाची लिम्का बुकमध्ये नोंद; २४ तासांत ३९.६९ किमीच्या बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण

एकमत ऑनलाईन

नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागाने २४ तासांत ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्याची विक्रमी कामगिरी केली असून, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही याची दखल घेतली आहे.या विक्रमी कामाबद्दल सा.बां.मंत्री अशोकराव चव्हाण यांनी अधिकारी-कर्मचारी व कंत्राटदाराचे कोैतुक केले आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण ते म्हासुर्णे या राज्य मार्ग क्र. १४७ वर बांधकाम विभागाने हा विक्रम नोंदवला. रविवार, ३० मे रोजी सकाळी ७ ते ३१ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सलग २४ तास काम करून या रस्त्याच्या एका लेनचे सुमारे ४० किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले. कोरोना काळात अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाच्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, व कामगारांनी केलेली ही कामगिरी आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे कौतुक करतो,अशी थाप सा.बां.विभागाचे मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.

आपण सर्वांनी महाराष्ट्र व देशाचा मान वाढवला आहे. हा विक्रम अभिमानास्पद आहे. पण आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम नोंदवणे अधिक अभिमानाचे ठरेल. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे वापरून नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दजेर्दार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे व त्या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश ना.चव्हाण यांनी दिले आहेत.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या