37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडपार्डीच्या शेतक-यांनी मिळविले टरबूजाचे विक्रमी उत्पादन; दिड एकरात दोन लाखांचे उत्पन्न

पार्डीच्या शेतक-यांनी मिळविले टरबूजाचे विक्रमी उत्पादन; दिड एकरात दोन लाखांचे उत्पन्न

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अधार्पूर तालुक्यातील पार्डी ( म. ) येथील एका युवा शेतक-यांनी जे विकेल ते पिकेल ह्ल या सुत्राचा आधार घेऊन दिड एकर शेतात टरबूज पिकाची लागवड करून विक्रमी उत्पादन मिळविले आहे. यातून त्यांना दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. ऐन उन्हाळ्यात शरीराला गोड थंडीचा गारवा देणारे, बाहेरून हिरवा आणि आतून लाल रंगाने आकर्षित करणा-्या टरबूजाला बाजारात नेहमीच मोठ्या प्रमाणात मागणी असते. याचा अभ्यास करून व ह्ल विकेल ते पिकेल ह्ल या सुत्राचा आधार घेऊन पार्डी ( म.) येथील युवा शेतकरी पप्पू देशमुख यांनी आपल्या दिड एकर शेतजमीत एस – २० प्रजातीच्या टरबूजाची लागवड केली होती. या दीड एकर क्षेत्रातील टरबूजाची तोडणी पुर्ण झाली असून टरबूजाचे एक फळ ५ ते ७ किलो वजनाचे आहे. यातून अंदाजे ३५ ते ४० टनांचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे.

शहरातील व्यापा-यांकडून घाऊक बाजारात ५ रुपये २० पैसे दर मिळाला असून केवळ ९० दिवसांत पीक पुर्णपणे तोडणीस आले आहे. बदलत्या हवामानाचा कसलाही फटका बसला नसला तरी कांहीअंशी मात्र मर रोगाची लागण झाल्याने योग्य वेळी फवारणी आणि योग्य नियोजन करून मर रोगाला आटोक्यात आणले त्यामुळे उत्पादनात थोडीशी घट झाली. आणि लॉकडाऊनच्या भीतीने तात्काळ विक्री त्यामुळे कमी भाव मिळाला जर योग्य दर मिळाला असता तर कमीत कमी तीन ते साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळाले असते. अशी माहिती शेतकरी पप्पू देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

उन्हाळ्यात कडक तापायला लागले की, ग्राहक टरबूजाला पसंती देतात. तर व्यापारी सुध्दा ह्ल गर्मी का दुश्मन ह्ल म्हणून ओरड करून टरबूजाची अधिक विक्री करतात. अशा वेळी टरबूजाला मोठी मागणी असते आणि भावही चांगला मिळतो. त्यामुळे शक्यतो आपला माल ऐन उन्हाळ्यात विक्रीला जाईल अशा बेताने शेतकरी सुध्दा टरबूज पिकाची लागवड करतो. मात्र काही वेळा अवकाळी पाऊस, गारपिट होवून टरबूजाच्या बागाच्या बागा उध्दवस्त होतात. आणि शेतकरी अर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी नफा आणि तोटा या दोन्हीही गोष्टी सहन करण्याची क्षमता फक्त बळीराजामध्येच दिसून येते.

परकीय चलन तस्करीत केरळच्या मुख्यमंत्र्यांचा हात?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या