27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडहरभरा विक्रीसाठी मंगळवारपर्यंत नोंदणी करावी

हरभरा विक्रीसाठी मंगळवारपर्यंत नोंदणी करावी

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणा-या हरभ-याच्या विक्रीपूर्व नोंदणीसाठी शासनाने मंगळवारपर्यंत मुदत दिली आहे. अशावेळी नोंदणीविना शिल्लक राहिलेल्या शेतक-यांनी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, व्हीसीएमएफ व महाएफपीसीकडून करण्यात आले आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेनुसार नाफेडकडून जिल्ह्यात दि महाराष्ट्र स्टेट को – आपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को – आपरेटिव्ह माकेर्टींग फेडरेशन, महा फार्मस प्रोड्यूसर कंपनी व पृथ्वाशक्ती एफपीसी या एजन्सीच्या माध्यमातून ५४ ठिकाणी हरभ-याची शासकीय खरेदी होत आहे.

ता. एक मार्चपासून सुरु झालेल्या हरभरा खरेदीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. बाजारात दर पडल्याने शेतकरी शासकीय खरेदी केंद्राना हरभरा विक्रीसाठी आणत आहेत. आजपर्यंत चार लाखकिं्वटलपर्यंत हरभरा खरेदी झाला आहे. सध्या विक्रीपूर्व नोंदणी सुरु असली तरी त्याची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतक-यांनी विक्रीपूर्व नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट को – आपरेटीव्ह माकेर्टींग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील, विदर्भ को-आपरेटिव्ह माकेर्टींग फेडरेशन वैभव ठाकरे, महा फार्मस प्रोड्यूसर कंपनीचे जिल्हा समन्वयक गणेश बिरु यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या