नांदेड:मुखेडमधील एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्या झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याचे शव घेण्यास दिला.तेव्हा माणुसकी धर्माचे पालन करित अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार पुर्ण करित येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांनी मयताच्या पार्थिवास मुखग्नी दिला.
कोरोनाच्या संसर्गाने संपुर्ण जग हादरले आहे. महाराष्ट्र आणि नांदेड जिल्हयातही दररोज शेकडो कोरोनाबाधित रूग्णांची भर पडत आहे. कोरोना आजारावर अनेक जण मात करून घरी परतत आहेत. मात्र वृद्ध आणि गंभीर आजारी रूग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अन् नेमके येथेच माणुसकी हरवल्याचा अनुभव येत आहे. कोरोनाबाधित मृत व्यक्तिचे शव घेण्यास अनेक नातेवाईक भितीपोटी नकार देत आहेत.
यामुळे मनपा,जिल्हा प्रशासन व तालुका स्तरावर नगर परिषदेच्या पुढाकाराने मयतावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. मुखेड येथेही एका कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यु झाल्यावर नातेवाईकांनी शव ताब्यात घेण्यास नकार दिला. तेव्हा कोरताही अडफाटा घेता माणुसकी धर्माचे पालन करित अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार पुर्ण करित येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार चव्हाण यांनी मयताच्या पार्थिवास मुखग्नी दिला.
यावेळी नायब तहसीलदार महेश हंडे, नगरपरिषदेचे शिवशंकर कुंचेवाड व इतर कर्मचारी उपस्थित होते. दोनच दिवसापुर्वी उमरी येथे असाच प्रकार घडला होता. तेव्हा तेथील मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोटे यांनी स्वत: मयताच्या तिरडीस खांदा घेत आपले कर्तव्य पार पाडले.नांदेड जिल्हयात प्रशासनाती अशा कर्तव्यदक्ष अधिका-यांचे कौतुक होत आहे.
Read More कोविड रुग्णांच्या मदतीला काकांनी परिवार पुन्हा सरसावले