23.9 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home नांदेड शेतक-यांसाठी दिलासा: रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार

शेतक-यांसाठी दिलासा: रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार

एकमत ऑनलाईन

नांदेड : खरिप हंगामात अतिवृष्टीच्या संकटाने हैराण झालेल्या नांदेड जिल्हयातील शेतक-यांसाठी रब्बी हंगामात दिलासा मिळणार आहे.विष्णुपूरी,मानार व पैनगंगा प्रकल्पातून येत्या आठ दिवसात रब्बी हंगामातील पिकांना प्रथम पाळीचे पाणी मिळणार असून या पाण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात नांदेड जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अक्षरश: जमिन खरडून पिके वाहून गेली होती.हाती तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने शेतकरी राजा हैराण झाला होता.

हे दुख: विसरून मोठया हिंमतीने रब्बी हंगामाची तयारी केली.मात्र या नगदी पिकांना पाण्याची गरज असल्यामुळे शेतक-यांकडून जिल्हयातील सिंचन प्रकल्पामधून पाणी पाळी देण्यात यावी अशी मागणी होती.अखेर ही मागणी मान्य झाली असून विष्णुपूरी,मानार व पैनगंगा प्रकल्पातून येत्या आठ दिवसात रब्बी हंगामातील पिकांना प्रथम पाळीचे पाणी मिळणार आहे. यात शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाम २०२०-२१ साठी एकुण तीन पाणी पाळया देण्याचे नियोजन आहे. यात पहिली पाणीपाळी बुधवार २५ नोव्हेंबरपासून देण्याचे नियोजन आहे.

उर्वरित पाणीपाळया बाबतचा अंतिम निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असून पाऊस व इतर अपरीहार्य कारणामुळे वेळापत्रकात बदल करण्यात येईल. यासाठी विष्णुपूरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी नमुना नंबर ७ व ७ अ मध्ये पाणी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुढील दर्शविलेल्या शर्तीस शासनाच्या प्रचलित नियमास अनुसरुन पाणी अर्जास मंजुरी देण्यात येईल. जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावीक़ालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक आहे,असे कार्यकारी अभियंता गव्हाणे यांनी सांगीतले.

तर निम्न मानार (बारुळ) यात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून या प्रकल्पावर रब्बी हंगामासाठी नियोजन करण्यात आले पहिली पाणीपाळी २५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व बागायतदारांनी पाटबंधारे शाखेत रितसर पाणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरुन सिंचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता एन. व्ही. पत्तेवार यांनी केले आहे.

यासोबत उर्ध्व पैनगंगा (इसापूर धरण) प्रकल्पातील पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या सर्व शासकीय सदस्यांसमवेत दृकश्राव्यद्वारे (व्हिसी) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली 19 नोव्हेंबर रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीत ठरल्यानुसार नियोजन करण्यात आले असून इसापुर धरणामधील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामासाठी पाणीपाळी क्रमांक एक २७ नोव्हेंबर पासून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील लाभधारक व इसापूर धरण जलाशय, अधिसुचित नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांना यांची नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव यांनी केले आहे.रब्बी हंगामासाठी पाणी मिळण्याचा निर्णय झाल्याने संकटात सापडलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परभणीत १२ पाणी व्यवसायांना ठोकले सील

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

मराठवाड्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष

नांदेड : भाजप सरकारच्या काळात मराठवाडा, विदर्भ यासह अन्य मागास भागाचा विकास करण्याचा अजेंडा होता. त्यामुळे तत्कालीन काळात अनेक मोठे प्रकल्प सुरु झाले. परंतु...

कंधार येथे भाजपाच्यावतीने वीज बीलाची होळी

कंधार : कोरोना सारख्या महामारीत गोरगरीब मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी, हात विक्रेते इत्यादींना लॉक डाउन कार्यकाळात काम धंदे बंद असल्याने उपजीविकेचा फटका बसला असे...

हदगावात दोन दुकानाला आग

हदगाव : शहरातील बसस्थानकाच्या समोरील हार्डवेर आणि न्युज पेपर एजन्सी जनरल स्टोअर या दोन दुकानाला रात्री बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली लागलेल्या भीषण आगीत...

शाळांची दारे १ डिसेंबरपर्यंत बंदच

नांदेड : नांदेड जिल्ह्यात कोरानाची वाढती रूग्ण संख्या चिंताजनक बनत असतांना आज सोमवार दि.२३ नोंव्हेबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. शिक्षकांच्या...

सराफाच्या सोन्यावर कारागीराचा डल्ला

नांदेड : हडको भागातील एका सराफा दुकानात काम करणा-या कारागीराने मालकाचा विश्वासघात करीत १५ लाख ५४ हजार ८०० रूपये किमतीचे सोने लंपास केले आहे....

भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

अर्धापूर : भोकरफाटा येथील भारतीय कापूस निगम लि. च्या कापूस खरेदी केंद्रावर शेतक-यांच्या कापसाचा दर्जा ठरवून कापूस खरेदीसाठी विरोध करून शेतक-यांचा कापूस परत पाठविले...

विजेच्या तारामुळे जीवीतहानीची शक्यता?

धर्माबाद (प्रतिनिधी) येथील विधूत वितरण कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शहरातील गल्ली बोळीत विजेचे मुख्य वाहाणी व विजेच्या खा़बावरून मीटर मध्ये घेण्यात आलेले...

हदगाव नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा

हदगाव : गेली दहा महिन्यापासून हदगाव नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगराच्या विकासाची कामे रखडलेली आहेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. या पूर्वीचे...

नांदेडात कोरोनाचा आलेख वाढला

नांदेड : नांदेड: शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आलेख वाढला आहे. सलग दोन दिवसांपासून नव्या ७२ बाधितांची भर पडली आहे.यामुळे कोरोनाची वाढली संख्या नांदेडकरांसाठी पुन्हा चिंताजनक...

राजकीय नेत्यांना चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या

अर्धापूर : शेणी येथील एका शेतक-यांने मुख्यमंत्री व पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी माज्या आत्महत्येची दखल घ्यावी अशी चिठ्ठी लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...