22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडनांदेडकरांना दिलासा : ६६५ नवे कोरोना रुग्ण

नांदेडकरांना दिलासा : ६६५ नवे कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या ३ हजार १९ अहवालापैकी ६६५ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ५२० तर अँटिजेन तपासणीद्वारे १५४ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ८० हजार १८२ एवढी झाली असून यातील ६७ हजार ६११ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १० हजार ७५७ रुग्ण उपचार घेत असून १८१ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक २८ ते ३० एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 552 एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.३२ टक्के आहे. अतिगंभीर प्रकृती असलेले रूग्ण-१८१. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 210, बिलोली 7, हिमायतनगर 8,माहूर 23,उमरी 5, लातूर 2, नांदेड ग्रामीण 8, देगलूर 52, कंधार 39, मुदखेड २६, परभणी ६, वाशिम २, मुखेड ३९, यवतमाळ २, नायगाव ३, हिंगोली ८ असे एकूण ५२० बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात ३०, बिलोली १, माहूर ८, मुखेड २०, नांदेड ग्रामीण २, देगलूर १७, मुदखेड २, नायगाव ५, अर्धापुर 10, धर्माबाद ६, किनवट २६, हिंगोली ६, भोकर २, हदगाव ५, लोहा ४, परभणी १ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे १४५ बाधित आढळले. आज जिल्ह्यातील १ हजार ३०४ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १६, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ६९६, धर्माबाद तालुक्यातंर्गत ९, देगलूर कोविड रुग्णालय १९, अर्धापुर तालुक्यातंर्गत १२, उमरी तालुक्यातंर्गत ५२, मालेगाव टीसीयु कोविड रुग्णालय १, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २८, मुखेड कोविड रुग्णालय ६४, मुदखेड कोविड केअर सेंटर ११, किनवट कोविड रुगणालय ४५, हिमायतनगर तालुक्यातर्गत ३८, बिलोली तालुक्यातंर्गत ४४, किनवट कोविड रुग्णालय २३, हिमायतनगर तालुक्यातंर्गत ३८, नायगाव तालुक्यातर्गत ६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ७, हदगाव कोविड रुग्णालय २१, कंधार तालुक्यातंर्गत ४३, माहूर तालुक्यातंर्गत २०, लोहा तालुक्यातंर्गत ६२, खाजगी रुग्णालय ११६ बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज ११ हजार ७५७ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १८०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ८८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) १६७, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ८५, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ११४, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ९४, देगलूर कोविड रुग्णालय ३७, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर ३९, बिलोली कोविड केअर सेंटर ७२, हिमायतनगर कोविड केअर सेंटर ४, नायगाव कोविड केअर सेंटर ३१, उमरी कोविड केअर सेंटर २९, माहूर कोविड केअर सेंटर १८, भोकर कोविड केअर सेंटर ५, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ६३, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ५१, कंधार कोविड केअर सेंटर १४ आहेत.

ड्रोनमधून कोविड लसीची होणार डिलिव्हरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या