34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home नांदेड लंगर साहिबच्या अन्नदान सेवेमुळे गरजू भुकेलेल्यांना दिलासा

लंगर साहिबच्या अन्नदान सेवेमुळे गरजू भुकेलेल्यांना दिलासा

एकमत ऑनलाईन

नांदेड:येथिल गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने नांदेड शहरात दररोज भुकेल्यांना जेवण वाटप करण्यात येत आहे. संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून सुमारे चार हजार गरजूंना यामुळे दिलासा मिळत आहे.

येथील श्री गुरुद्वारा लंगर साहियच्या वतीने दि.१६ जुलैपासून पुन्हा लंगर सेवेला सुरुवात करण्यात आली असून दररोज सुमारे चार हजार भुकेल्यांना जेवण मिळत आहे. संत बाबा नरेंद्र सिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरु आहे. शहरात रेल्वे स्टेशन, बसस्थानक,दत्तनगर, गोकुळनगर इ. भागांत दररोज जेवण पुरविण्यात येत आहे.

शहरातील सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानंतर लंगर साहिबच्या सेवादारांनी तिथेही धाव घेत मदतीचा हात दिला. लंगर वितरणासाठी वेगवेगळी वाहने आहेत. ही वाहने विविध भागांत जाऊन सेवा देतात. पहिल्या लॉकडाऊनच्या काळातही सुमारे तीन ते चार लाख गरजूंना आधार मिळाला होता. आता पुन्हा हि सेवा सुरू झाल्या मुळे भुकेल्याना अन्नाची सोय झाली आहे.मध्यंतरी काही दिवस अन्नदानाची ही सेवा खंडीत झाली होती. मात्र गुरूव्दारा लंगर साहिबने अन्नदानाची सेवा सुरू केली आहे.

Read More  शहरात कोरोनासह मलेरिया डेग्यू रोग पसरण्याची भिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या