25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडरेमडेसिवीर देता का कुणी... रेमडेसिवीर; रूग्णांचे नातेवाईक नटसम्राटच्या भुमिकेत

रेमडेसिवीर देता का कुणी… रेमडेसिवीर; रूग्णांचे नातेवाईक नटसम्राटच्या भुमिकेत

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोराना बाधित रूग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.सोमवारी केवळ १९२ इंजेक्शन प्राप्त झाले आहेत.मागणी पेक्षा दररोज इंजेक्शनचा पुरवठा अंत्यत कमी होत आहे.यामुळे गंभीर रूग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरून रेमडेसिवीर देता का कुणी…. रेमडेसिवीर… असे म्हणत नटसम्राटाची भुमिका बजावावी लागत आहे.

गेल्या महिन्यापासून नांदेडात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.याच बरोबर गंभीर रूग्णांत झपाट्याने वाढ होत आहे.यामुळे रूग्णांसह नातेवाईकांना उपचारासाठी रूग्णालय शोधण्यासह ऑक्सीजन व बेड मिळविण्यासाठी भटकावे लागत आहे.ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे,अशा लोकांना ऑक्सीजन,बेड काहींच्या हिसंबधाने मिळत आहेत.परंतू गरिबाला भटकंती करून शासकीय रूग्णालयाचा आसरा घ्यावा लागत आहे.त्यात हे कमी की म्हणून कोरोनाच्या गंभर रूग्णाला आवश्यक असलेले रेमडेसिवीर या इंजेक्शनसाठी दारोदार फिरावे लागत आहे.

यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढत शहरातील प्रत्येक कोविड रूग्णालयास गंभीर रूग्णाच्या आवश्यकतेनूसार या इंजेक्शनचा थेट यादीनिहाय पुरवठा करित आहे. रेमडेसिवीरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे मात्र पुरवठा अंत्यत कमी होत आहे.जिल्हाधिकारी डॉ.विपीन रूग्णांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शर्तीचे प्रयत्न करित असून कोरोना रूग्णांसाठी शासनाकडे १५५ इंजेक्शनची मागणी केली आहे.तरी सुद्धा या मागणी पेक्षा इंजेक्शनचा कमी पुरवठा होत आहे.

सोमवारी तर केवळ १९२ इंजेक्शन विविध कोविड रूग्णालयास मिळाले आहेत.परिणामी अनेक गंभीर रूग्णांना इंजेक्शनसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.यामुळे गंभीर रूग्णांच्या नातेवाईकांना शहराभर वणवण फिरून रेमडेसिवीर देता का कुणी….. रेमडेसिवीर.. असे म्हणत नटसम्राटाची भुमिका बजावावी लागत आहे.

परदेशातून येणा-या मदतीवर आयजीएसटी नाही; ३० जूनपर्यंत राहणार सूट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या