नांदेड : लग्नासह शुभ कार्य असले की एसटीच्या सुरक्षित प्रवास म्हणून लालपरी मिळावी म्हणून प्रासंगिक करार करण्यात येत असे. परंतू गेल्या काही वर्षात एसटीने केलेली भाडेवाढ अशा कराराच्या मुळावर उठली आहेÞ भाडेवाढीमुळे व-हाडी मंडळी एसटीच्या प्रवासाकडे पाठ फिरविली आहेÞ आता ही जागा एसीसह सर्व सुविधा देणा-या खासगी बसने घेतली आहे.
अगदी कोरोना काळाच्या अलिकडे विश्वसनीयता आणि सुरक्षितता म्हणून लग्न कार्यात व-हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी लोकांची पहिली पसंती एसटीच्या लालपरीला होती. त्यामुळे लग्नाच्या सिझनला शहरासह ग्रामीण भागातसुद्धा लग्नात पाहुणे मंडळी एसटी बसने उतरत होते. हे चित्र गेल्या काही वर्षांपर्यंत चांगले होते. त्यात कोरोनाचे संकट आणि कर्मचा-यांनी चार महिने केलेले कामबंद आंदोलन याचा मोठा फटका एसटीला बसला आह.
दररोजची वाहतुक आणि लग्न सोहळयासह अनेक शुभ कार्याच्या प्रवासाला एसटी प्राधान्य दिले जात असेÞ या प्रासंगिक करारातमधून चांगले उत्पन्न मिळत होते. एप्रिल ते जून या तीन महिन्यातील लग्नाच्या सिझनमध्ये दरदिवशी एका आगारातून सात ते दहा बस लग्नाच्या केल्या जात असत. आता मात्र गेल्या दोन चार वर्षात हे प्रमाण नगण्य झाले आहे. आता केवळ दोन ते तीन बस जात असल्याचे दिसून येत आहे.
चार वर्षांपूर्वी लालपरीचे भाडे ३० ते ३५ रुपये प्रत्येक किलोमीटर असायचे. आता त्यात वाढ होऊन ६३ रुपये किलोमीटर झाले आहे. त्यातल्या त्यात १८ टक्के जीएसटी आणि १० टक्के सुरक्षा अनामत रक्कम ठेवावी लागते. त्या तुलनेत खासगी बस मात्र थेट ठेका पद्धतीने लग्नाची बुंिकग घेऊन मोकळे होतात. त्यांचे भाडे कमी आणि उकाड्यात वातानुकूलित गाडीसह आधुनिक सुविधा प्रवाशांना मिळते. एकंदरीतच भाडेवाढीमुळे एसटीची लग्नाची बुंिकग निम्म्यापेक्षाही कमी झाली असून त्याचा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत आहे. तर दुसरीकडे खासगी बसच्या प्रवासाला आता जास्त प्राधान्य मिळत आहेÞ एसटीपेक्षा भाडेही कमी आणि लांबचा प्रवास असल्यास एसीत झोपून जाण्याची सोय उपलब्ध असल्याने पहिली पसंती खासगी वाहनांना मिळत आहे. परिमाणी, नागरिकांनी एसटी महामंडळाच्या प्रासंगिक कराराकडे व-हाडी मंडळीने पाठ फिरवल्याने हमखास उत्पन्नाचा स्त्रोत संपण्याच्या मार्गावर आहे.