कुंडलवाडी : प्रतिनिधी
बिलोली तालुक्यातील आरळी गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण, सामूहिक संविधानाचे वाचन, बक्षीस वितरण व वादविवाद स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आरंभी संस्थेचे अध्यक्ष हाजप्पा पाटील सुंकलोड, सैनिक बालाजी त्रिमल, मुख्याध्यापक मुकेश बोधनकर, माजी मुख्याध्यापक गंगाधरराव चिवटे आदी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर संस्थेचे अध्यक्ष हाजप्पा पाटील सुंकलोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर आजचे राजकारण लोकशाहीस तारक की मारक या वादविवाद स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैनिक बालाजी त्रिमल तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हाजप्पा पाटील सुंकलोड, उपाध्यक्ष प्रतिनिधी शिवराज पाटील बोधने, सचिव माधवराव पाटील सुंकलोड, सदस्य विठ्ठलराव पाटील लिंबुरे, शंकरराव सुंकलोड, मुख्याध्यापक मुकेश बोधनकर, माजी मुख्याध्यापक गंगाधरराव चिवटे, माजी उपसरपंच सिद्राम पाटील पांडागळे, धोंडीबा शिळेकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
लक्ष्मण इबत्तेवार व त्यांच्या संचाने गायलेल्या बहारदार महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंदिनी मोतेवार,सिफा सय्यद, प्रियंका कुंभार विजयलक्ष्मी मठपती, श्रीनाथ पोतदार, संजना दुडले, इंद्रायणी शेटकर, हुजूर सय्यद, निशाद शेख, गायत्री कुंभार, अभिषेक नरहरे, श्रेया चिवटे, पल्लवी खरबाळे व शुभांगी पांचाळ आदी स्पर्धकांनी आपले विचार मांडले.
श्रेया चिवटे व पल्लवी खरबाळे यांनी मांडलेले विचार सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत प्राथमिक गटातून श्रीनाथ पोतदार, प्रियंका कुंभार व संजना दुडले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले तर माध्यमिक गटातून श्रेया चिवटे, पल्लवी खरबाळे, अभिषेक नरहरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर बाजी मारली. या सर्व विजेत्यांना व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पधेर्तील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी सैनिक बालाजी त्रिमल यांनी आपले विचार मांडत विद्यार्थ्यांना सैनिक भरतीच्या अनुषंगाने तयारी करण्याचे व देशसेवा करण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षीय समारोपात केले.