26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याची तहसीलदाराकडे मागणी

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्याची तहसीलदाराकडे मागणी

एकमत ऑनलाईन

देगलूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदाना पासून वंचित शेतकरी बांधवांना लाभ देण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार कदम यांना भेटून मागणी करण्यात आली. कृषी प्रधान देशातील शेतकरी बांधवांना ज्यांना बळीराजा, अन्नदाता म्हणून संबोधले जाते अशा शेतकरी बांधवांना निराधार व श्रावणबाळ योजनेच्या वृद्धांना लाभार्थींना महिना १२०० रु. अनुदान दिले जाते.

पण शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना ५०० रुपये महिना तुटपुंजी रक्कम देण्यात येत असल्याने अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील देगलूर शहर प्रमुख बालाजी मैलागिरे शहर समन्वयक विनोद सोनकांबळे, शाखाप्रमुख अशोक देशमुख, देविदास जाधवतडखेलकर, श्यामसुंदर देशमुख, श्रीनिवास उल्लेवार, आदीची उपस्थितीत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या