34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home नांदेड धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले देऊन आरक्षणाची अमलबजावणी व्हावी

धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले देऊन आरक्षणाची अमलबजावणी व्हावी

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर (प्रतिनिधी) : भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजास अनुसूचित जातीचे दाखले देऊन आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी यासह समाजाच्या विविध मागंण्याचे निवेदन शुक्रवारी तहसीलदार जाधव यांना देण्यात आले आहे.

हिमायतनगर तालुका धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी तहसीलदार जाधव यांना धनगर समाजास अनुसूचित जातीचे दाखले देऊन आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी,धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सारथी संस्थेप्रमाणे स्वातंत्र्य संस्था स्थापन करण्यात यावी ,सन 2019-20 च्या आर्थिक वर्षात धनगर समाजासाठी 1000 कोटी रूपये मंजुर केले होते ते सर्व पैसे धनगर समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्यात यावे ,मेंढपालावरील वाढते हल्ले लक्षात घेऊन हल्ले खोरावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यामुळे धनगर समाजास अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्याची अमलबजावणी करून न्याय द्यावा अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आनंत देवकते,बळीराम देवकते,दताञ्य हगंरगे ,बाबुराव होनमने,पांडुरंग खंदारे,महेश ताडकुले,विलास आडंगे ,यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बाधंवाची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘होय सुशांत ड्रग्ज घेत होता’,सारा अली खान, श्रद्धा कपूरने चौकशी दरम्यान दिली कबुली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या