19.1 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home नांदेड अभ्यासक्रम पुर्ण करून घेण्याची शिक्षकांची जबाबदारी

अभ्यासक्रम पुर्ण करून घेण्याची शिक्षकांची जबाबदारी

एकमत ऑनलाईन

नांदेड: इयत्ता नववी व दहावीचे वर्ग असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा दि.२ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आल्या .आठ महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने शाळा परिसर गजबजला आहे.आता अभ्यासक्रम पुर्ण करून घेण्याची शिक्षकांची जबाबदारी आहे असे मत आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी व्यक्त केला.

नांदेड तालुक्‍यातील विष्‍णूपूरी येथील जिल्‍हा परिषद हायस्‍कुलची आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, उपसभापती राजू हटकर, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी बालाजी कुंडगीर, उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांनी पाहणी केली. यावेळी विलास हंबर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य साहेबराव हंबर्डे, विश्‍वनाथ हंबर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांची उपस्थिती होती.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी खबरदारीचा उपाय म्‍हणून शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्‍याचा शासनाने निर्णय घेतला होता. परंतु आता परिस्थिती पूर्ववत होत असून कोरोनाचे आढळणारे रुग्‍णांची संख्‍या कमी होत आहे. त्‍यामुळे आता शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शैक्षणीक वषार्चा कालावधी आता कमी असल्‍यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आता सर्व शिक्षकांवर आहे. शिक्षक परिश्रमाने व काटेकोर नियोजन करुन आव्हान पेलतील अशी अपेक्षा शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. शाळेत आल्यानंतर हात सॅनिटाईज करणे, शरीराच्या तापमानाची तपासणी, मास्क लावून विद्यार्थ्यांना अंतराने बसवणे या सर्व नियमांचे पालन करण्‍यात आले. आज पहिल्याच दिवशी विष्‍णूपूरी येथील जिल्‍हा परिषद हायस्‍कुलमध्‍ये २६६ पैकी ११८ विद्यार्थ्‍र्यांनी आपली उपस्थित दर्शविली. शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी विष्णुपुरी शाळेला भेट देऊन कोरोना संदर्भात शाळेने केलेली जनजागृती आणि एकूण कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक आनंद रेणुगुंटवार यांच्यासह उदय हंबर्डे, पर्यवेक्षक दिग्रसकर कांबळे, शिवाजी वेदपाठक, कृष्णा बिरादार, आनंद वळगे, डी.के.केंद्रे, राजेश कुलकर्णी यांनी याकामी परिश्रम घेतले.

कामळज , कौडगाव , येळी घाटावर वाळूचा अवैध उपसा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या