33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे निकाल

एकमत ऑनलाईन

देगलूर तालुक्यात अनापेक्षित निकाल
नरसिंग अन्नमवार : शुक्रवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी हाती आला असून तालुक्यात अनपेक्षित निकाल घोषित झाला असून काही प्रस्तापित गाव पुढा-्यांची प्रतिष्ठा पणाला मिळाल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रीतम देशमुख व भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे यांचे बालेकिल्ला मतदारांनी नेस्तनाबूत केला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचाही मरखेल ग्रामपंचायतीमध्ये निसटता पराभव झाला आहे तर देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर यांनाही मतदारांनी दिवसाढवळ्या चांदण्यात दाखविले आहेत.

धनेगाव, विष्णूपुरीत महाविकास आघाडी , गोपाळ चावडीत नवचैतन्यचे वर्चस्व
ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी निकाला मध्ये धनेगाव विष्णुपुरी येथे महाविकास आघाडीला तर गोपाळ चावडी येथेनवचैतन्य विकास पॅनलला तर .अत्यंत लक्षवेधी झालेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील २४ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांचं लक्ष वेधले गेले होते. ग्रामीण पोलीस स्टेशन हदीतील २४ गावात १५ जानेवारी रोजी निवडणूक मतदान झाले.

धनेगाव येथे महाविकास आघाडीचे ग्रामविकास पॅनल चे निवडणूक उध्दव शिंदे .शेख गफुर शेख गफुर.हाफीजा बी.शेख.गफूर ,ललिता संग्राम निलपत्रेवार ,.चंद्रकला गोविंद बोटला वार हे बिनविरोध निवडून आले.तर गंगाधर प्रताप शिंदे.शिंदे पूजा मनोहर.भालके भुजंगराव ग्यानोबा शिंदे सिमा प्रकाश, .शाहिन बेगम रफी अहेमद, शिंदे विजयाबाई देवराव,.ठाकुर शेलेद्रसिंह,. वाघमारे राजेश्री रमेश , जंगमे सुरेखा शेषैराव, गजभारे जयमाला दिलीप,.ढवळे तातेराव, निवृती, बुचडे ,लक्ष्मीबाई शिवाजी ,हे प्रचंड मताधिक्यानी विजयी झाले.यांचा विजया साठी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे. राष्ट्रवादी चे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष गंगाधर पाटील कवाळे शिवसेनेचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे.नितीन पाटील शिंदे.यांचा सह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. गोपाळ चावडी येथील नवचैतन्य विकास पॅनल चे अकरा पैकी अकरा सदस्य विजयी झाले.यात हणमंत मैलगे.गिरजाबाई डाकोरे.साहेबराव सेलुकर.नितीन अंधारे.संगिता तालमीकर.कविता कतुरे.छायाबाई खटके.सुरेखा लागे.अश्विनी लवटे मयुरी नायगावे अशोक अंकुलवार हे विजयी झाले.

किकी येथे दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र सैवानिवृत सैनिक कामाजी मारोतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संतकृपा पॅनल चे पाच पैकी चार उमेदवार निवडून आले.यात सुनिता प्रकाश किरकण कविता रवि किरकण.ज्ञानेश्वर ऊतम किरकण हे तीन विजयी झाले तर निवडणूक पुर्व दिक्षा माधव मगरे या विरोधी गटाचा एक बिनविरोध निवडून येऊन चार जागा पॅनलला मिळाल्या. बाभुळगाव येथे ग्रामपंचायत च्या नऊ जागेसाठी तिहेरी लढत झाली यात विघमान पॅनल एकही जागा विजयी संपादन करता आली नाही.अशोक मोरे यांच्या महाविकास शेतकरी पॅनल चे बाळु जाधव.छायाबाई आडे.मनूकाबाई आडे तर संतगाडगे बाबा पॅनलचे पुंडा म्हस्के.आंनदा गिरी.सुंदरा बाई राजु म्हस्के संजय लांडगे काळेशवर म्हस्के . पार्वतीबाई माधव बोडके हे सहा उमेदवार विजयी झाले.

विष्णुपुरी येथै महाविकास आघाडीच्या महिला पॅनल च्या निवडणूक पुर्व आठ जागा बिनविरोध निवडून आल्या तर सात जागांसाठी निवडणूक झाल्या होत्या .विजयी झालेल्या उमेदवारात इंदुबाई रामराव हंबडे.अरचना विश्वनाथ हंबर्डे.कविता बालाजी सातपुते.संध्या ऊर्फ विलास हंबडे.जनाबाई गोविंद शेबोले.सुमित्रा रोहीदास खंदारे.प्रियंका रेणुकादास हंबडे.अर्चना दता कंठाळे.सिमा चांदु वाहुळकर .सत्यभामा संतोष बारसे.गायत्री स्वामी हाटकर.प्रतिभा पंडित हंबर्डे.अर्चना राजु हंबर्डे.विघासागर संजय कांबळे. या १४ तर एक अपक्ष कालीदा अनिल हंबर्डे या विजयी झाल्या.

वाजेगाव येथे जनता आघाडीचे निवडणूक पुर्व दोन‌ ऊमेदवार बिनविरोध निवडून आले होते.उर्वरित पंधरा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत जनता विकास आघाडीच्या गोसिया बैगम शेख जमील,.शेख जमिल अमिर हामजा.,सोळुंके कावेरी,.खुंतेजा बी अब्दुल गफुर .गजभारे मधुकर भुजंगराव.माजीद खान वाहेद खान .आधावे शोभा बाई तातेराव‌.शेख जाफरशा बाबाशा .शैख यसदानी मौलाना.शेख ताहे र खाजा मियां.दोलत बी.शेख कासिम.फरहा बेगम शेख जमील खमरबी शेख उमर. म्हेत्रे रावसाहेब सोपानराव हे तर विरोधी गटाच्या नुर जहा शेख हबीब या निवडुण आल्या. कांकाडी येथे सत्याई देवि पॅनलला १० पैकी ९ तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या असून यात सुदीम बागल, कांताबाई बागल ,अयोध्या गंगातीरे, शरद भंवर, प्रियंका कोल्हे ,बाळू वाघमारे ,,जनाबाई वरर्तांले ,,सुलोचना वाघमारे चौत्राबाई गायकवाड हे ९ विरोधी गटाचे दोन उमेदवार विजयी झाले.

नायगाव तालुक्यात निकालानंतर जल्लोष
नायगाव तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्‍या निवडणूक निकाला नंतर तहसिल कार्यालयासमोर विजयी उमेदवारांनी व त्यांच्‍या समर्थकांनी जल्‍लोष केला आहे. ६८ ग्रामपंचायत पैकी पांच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्‍या असून ६३ ग्रामपंचायतीचा निकाल सकाळी एक तास उशिरा म्हणजे दहा वाजता निवडणूक निर्णय आधिकारी तथा तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात करण्यात आले संपूर्ण निकाल दुपारी चार पर्यंत जाहीर झाला आहे.यावेळी जिल्हाधिकारी विपिन इटनकर, निवडूनी उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी निवडणूक विभागात भेट दिली.

नायगाव तालुकयातील ६८ ग्रामपंचायतीच्‍या पंचवार्षीक निवडणूकीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला. पण निवडणूकी पुर्वीच पांच ग्रामपंचायती बिन विरोध जाहीर झाल्‍या आहेत. तर ६३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्‍या निवडणूकीची मतमोजणी तहसिल कार्यालयातील हॅल क्रमांक ४ मध्ये सोमवारी दि.१८ जानेवारी रोजी झाली. हि निवडणूक इलेर्क्‍ट्रॉनीक मशिन पध्‍दतीने झाल्यामुळे निकाल दुपारी चार वाजे पर्यंत पुर्ण जाहीर करण्‍यात आला आहे. कुंटुर, निळेगव्हाण, मांडणी, टेभुर्णी,टाकळी त.मा.,आदी ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर झालेल्‍या आहेत.

दि.१८ रोजी सकाळी दहा वाजता बहुचर्चित असलेल्या नरसी ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला व या ग्रामपंचायतीवर श्रावण पाटील भिलंवडे , भास्कर पा.भिलंवडे , राम पा.भिलंवडे ,संभाजी पा.भिलंवडे यांच्या ताब्यात १३ तर माणिकराव लोहगावे यांच्या ताब्यात २ तर २ अपक्षानी पहिल्यादाच बाजी मारली .स्वच्छता दुध माधवराव पा.शेळगावकर यांच्या हातुन गावातील सत्ता जात ९ जागेपैकी चार जागा शेळगावकर गटाचे तर पाच उमेदवार प्रा.तोटरे गटाचा विजय झाल्याने येथे सत्ता परिवर्तन झाले आहे. मोकासदरा येथे मतदारांनी परिवर्तन करत हरी पाटील मोकासदरेकर यांच्या पॅनलचे नऊचे नऊ उमेदवार विजयी झाले तर हुस्सा येथे विद्यमान सरपंच बाबासाहेब हबर्डे यांच्या पॅनलचे नऊचे नऊ उमेदवार विजयी झाले व प्रतिस्पर्धी उमेदवारांचा धुवा उडवीला आहे तर होटाळा येथे शिवराज पाटील यांची सत्ता कायम राहीली ,कुचेली येथे जयवंत पा.होनराव ,तर कांडाळा येथे चांदु ईरेवाड यांचे पॅनल विजयी झाले तर मुगाव येथे नारायण पा.गाडले यांच्या पॅनलनी आशोक पा.मुगावकर यांच्या पॅनलला धुळ चारली , टाकळी .येथे मोहन पाटील टाकळीकर यांच्या पॅनलाचा धुव्वा उडवित सचिन पा.टाकळीकर यांचे पॅनल विजयी झाले ,नांवदी येथे उमाकांत देशपांडे यांनी सत्ता काबीज केले तर आ.राजेश पवार यांच्या गावात आलुवडगाव येथे आ.गटाचे तीन तर विरोधी गटाचे सहा उमेदवार निवडून आले.

गडगा येथे अटीतटीचा सामना होऊन नव्यानेच पॅनल केलेले शिवा पा.गडगेकर यांच्या गटाचे आठ तर विरोधी गटाचे तीन उमेदवार निवडून आले.कुष्णूर येथे जि.प.सदस्या यांच्या पतीच्या पॅनलचे तीन जागा निवडून आल्या तर विरोधी गटाचे आठ उमेदवार निवडून आले.कोलंबी येथे मतदारांनी पुन्हा संजय बियाणी यांच्या हाती सत्ता दिले .रातोळी येथे सहा जागा बिनविरोध निघाल्या होत्या तीन जागेसाठी निवडणूक होऊन तीनही जागा आ.राम पाटील गटाच्या निवडून आल्या .अंचोली येथील जनतेनी सुनिल पा.मोरे यांच्या पॅनलला निवडून दिले तर माजंरम येथील मतदारांनी माजी.आ.वसंतराव चव्हाण यांचे मेव्हणे शिवराज पा.शिदे यांच्या पॅनलला एक हाती सत्ता दिली. घुगंराळा येथे पुन्हा वसंत पा.सुगावे याचे वर्चस्व कायम राहीले , धुप्पा येथे कुषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मोहनराव पा धुप्पेकर याच्या पॅनलचा दनदनीत पराभव करुन मा खा भास्करराव पाटील खतगावकर व मा आ वसंतराव पाटील चव्हाण यांचे खंदे समर्थक गणपतराव पा धुप्पेकर यांचे ९ उमेदवार मताधिक्यानी निवडून सत्ता काबीज केली तर रूई बु.येथे मतदानाच्या दिवसी हानामारी झाल्याने वातावरण तंग झाले होते .येथील जनतेनी कुंटूरकर गटाचे निलेश देशमुख यांच्या हाती सत्ता दिली.बळेगाव येथे गंगाधर पा.बेलकर यांच्या पॅनलचे नऊ उमेदवार भरघोस मतानी निवडून येत ग्राम पंचायत ताब्यात घेतले .कोठाळा येथे पांढरे व वाघमारे गटाचे चार तर विरोधी गटाचे तीन उमेदवार निवडून आले तर कहाळा खु येथे रावण पाटील यांचे नऊ पैकी पांच जागा मिळवुन विजय मिळवला आहे. तर कहाळा बु येथे सुनिल पा लुगारे याच्या गटाचाच नऊ पैकी पांच उमेदवार विजयी होवुन सता काबीज केली आहे.

बिलोली तालुक्यात अनेक प्रस्तापितांना धक्का तर काही ठिकाणी सुरुंग
बिलोली तालुक्यातील ६४ पैकी चार ग्राम पंचायत ह्या यापूर्वी बिन विरोध निघाल्या तर उर्वरित ६० ग्राम पंचायतीचा निकाल सोमवारी कडेकोट बंदोबस्तात जाहीर करण्यात आला.यावेळी अनेक गावात प्रस्तापितांना जबर धक्का बसला तर काही ठिकाणी विरोधी गटाने सुरुंग लागले आहे.

बिलोली तालुक्यातील ६० ग्राम पंचायतीचा निकाल सकाळी दहा वाजल्या पासुन तहसिल कार्यालयात सुरु झाला.मुतळ्याळ व रुद्रापुर येथील येथील घटणेच्या पार्श्वभूमीवर उपविभागिय पोलीस अधिकारी शिद्धेश्वर धुमाळ यांनी अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.या निवडणुकीत कासराळीत लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या पँनल ने आपली अब्रु कायम ठेवत १३ पैकी ७ उमेदवार हे निवडुन आले तर ६ सदस्य हे विरोधी गटातील माजीद शेख यांचे सदस्य निवडुन आले आहेत.सगरोळीत रोहीत देशमुख यांच्या पँनल ने गड कायम राखण्यात यश आले १७ पैकी ९ सदस्य हे निवडुन आले तर विरोधी शंकर महाजन या परिवर्तन पँनलला ८ सदस्या पर्यत मजल मारली आहे.आळंदीत गेल्या अनेक वर्षा पासुन सत्तेत असलेल्या मसुद देशाईला मोठा धक्का बसला आहे सर्वच्या सर्व नऊ जागा ह्या परिवर्तन पँनलने जिंकल्या आहेत.

मुतळ्याळ मध्येही सत्ताधा-याला धुळ चारत जक्कलवाड च्या पँनल ने सर्व नऊ जागा पटकाविल्या.आरळीत सत्ता पालट झाली असुन हाजप्पा पा,सुंकलोड गटाला हादरा बसला तर तेथे सदाशिव बोडके,ओम पा.बोडके यांनी सत्ता काबिज केले.बामणीत हनमंत पाटील यांनी सत्ता कायम ठेवली तर येथे सिदप्पा पा.कत्रे यांची हार झाली आहे.आदमपुरात प्रभाकर च्या पँनलला धक्का बसला असुन येथे अंबादास शिनगारे यांच्या पँनलचा विजय झाला.जिगळ्यात प्रताप पा.जिगळेकर यांनी बाजी मारली आहे.हज्जापुरात शिवाजी चंदनकर यांच्या पँनलचा विजय झाला.कामरसपल्लीत बालाजी मालेगावे यांच्या गटाचे सहा सदस्य निवडुन आले.बोरगावात माजी जि.प.अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे पुत्र सुनिल एंबडवार यांच्या पँनलचा दनदनीत विजयी झाला,तर चिरलीत पुन्हा पत्रकार अशोक दगडे यांनी गड राखत सात पैकी चार जागावर विजयी संपादन केले.कांगटीत किशन टोकलवाड गटाला पाच जागा मिळाल्या,तर दुगाव मध्ये केदार पा,सांळुके यांना जबर धक्का देत भाजपाचे बालाजी कदम व प.स.सदस्य संभाजी शेळके यांनी नऊ पैकी सहा जागा जिंकुन आनल्या.

येसगीत गंगाधर प्रचंड यांच्या पँनलचा मोठा विजय झाला येथे शिवराज चनपनोर यांची मोठी हार झाली.केसराळीत शांतेश्वर काळे यांच्या पँनलने विजय मिळविला,बडुर मध्ये प्रकाश पाटील,बाळा गुजरवाड यांच्या पँनलने विजय संपादन केले,थडी सावळीत माजी प.स.सभापती व्यंकट पांडवे यांची पिछेहाट झाली सात पैकी यांनी तिन जागा मिळाल्या तर माजी सभापतीच असलेल्या गंगाधर अनपलवाड यांच्या पँनलला चार जागा मिळाल्या.पोखर्णीत प्रकाश पाटील यांच्या पँनलला पाच जागा मिळाल्या.तर डौर मध्ये खयुम पटेल यांच्या पँनलचा विजय झाला येथे नऊ पैकी सहा जागा मिळाल्या तर खलील पटेल याना तिन जागेवर समाधान मानावे लागले.चिचांळ्या माजी सभापती सुभाष पा.चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश पा.चिंचाळकर यांनी कायम गड राखत नऊ पैकी सहा जागा काबिज केल्या तर शेतकरी विकास पँनलला तिन जागा मिळाल्या मोठी ग्राम पंचायत असलेल्या लोहगावात मात्र पाच पँनल होते यात प्रा.यादव कोरनुळे,व्यंकट नाईनवाड यांच्या पँनलला तेरा पैकी सात जागा जिंकल्या तर विरोधात सहा जागा गेल्या.डोनगाव बु.मध्ये उपसभापती शंकर यंकम व नियलवाड यांच्या पँनलला सात जागा मिळाल्या.

सावळीत भाजपा भाजपा मध्येच लढत झाली असुन शंकर काळे यांना सहा तर चंद्रशेखर पाटील यांना पाच जागा मिळाल्या.मिनकीत भाजपाचे जिल्हा चिटणीस आनंद बिराजदार यांना नऊ पैकी सहा जागा मिळाल्या तर विरोधी गटाला दोन जागेवर समाधान मानावे लागले.एकंदरीत ही मतमोजनी शांततेत पार पडली असुन निर्वाचन अधिकारी म्हणून तहसिलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी उत्तमपणे नियोजन केले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या