21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडनिवृत्त फौजी संतापले.. बुलेट ट्रेनवर मत व्यक्त केले

निवृत्त फौजी संतापले.. बुलेट ट्रेनवर मत व्यक्त केले

एकमत ऑनलाईन

नांदेड : मराठवाड्यात पुर्वी रेल्वे मिटरगेज लाईन होती.यासाठी मराठवाड्याचे जेष्ठ नेते कै. गोविंदभाई श्राफ, कै. डॉ. शंकरराव चव्हाण सारख्या नेत्यांना रस्त्यावर उतरावे लागले तेव्हा कुठे मिटरगेज मधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले. आजघडीला हैदराबाद ते मनमाड पर्यंत दुहेरी इलेक्ट्रीकल रेल्वे लाईन नाही आणि बुलेट ट्रेनचे स्वप्न कसे साकार होणार असा संतप्त सवाल भारतीय नौदल सेना निवृत्त अधिका-याने उपस्थित केल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

काही वर्षापुर्वी संपूर्ण मराठवाड्यात मिटरगेज रेल्वे लाईनचे जाळे होते. त्यामुळे मराठवाड्याचा विकास अनेक वर्षे रखडला. दळणवळणाची साधने नसल्यामुळे आजही मराठवाडा मागासवर्गीय भाग म्हणून ओळखल्या जातो. पश्चिम महाराष्ट्रात इंग्रजासह तेथील नेत्यांनी विकासात राजकारण केले नसल्यामुळे झपाट्याने विकास झाला. मराठवाड्यात रेल्वे ब्रॉडगेज आणण्यासाठी स्व. गोविंदभाई श्रॉफ, कै. शंकरराव चव्हाण, कै.सुधाकरराव डोईफोडे यांच्यासारखे नेते रस्त्यावर उतरल्यामुळे मराठवाड्यात रेल्वे मिटर गेजचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये झाले. यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यानंतर ब्रॉडगेजची निर्मिती झाली.

त्यावेळी सारखे नेते आता उरले नाहीत. त्यानंतर ब्र्रॉडगेजचे रुपांतर इलेक्ट्रीकमध्ये अध्याप झाले नाही.एवढेच नव्हे तर हैदराबाद ते नांदेड रेल्वे दुतर्फी मार्ग पूर्ण झाला नाही. मग बुलेट ट्रेनचे गाजर कशामुळे हा संशोधनाचा विषय आहे असे म्हणत शहरातील रस्ते नॅदरलँडच्या धरतीवर निर्माण करण्यात आले. १२ वर्षानंतरही यावर कुठलीच देखभाल झाली नसल्यामुळे आजघडीला प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे सामान्य नागरिक मालमत्ता कर भरुनही दरदिवशी अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळे भाजपच्या एका नेत्याने वास्तव बोलल्यानंतर सत्ताधा-यांना झोंबण्याचे कारण नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले.

विकासात्मक वल्गना रोज प्रसिध्दी माध्यमातून वाचायला मिळतात परंतु त्या पूर्णत्वास गेल्याच्या फार कमी ठिकाणी पहावयास मिळत आहे. काही वर्षापुर्वी उर्दू घरची निमित्ती करण्यात आली. त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. केवळ उदघाटन झाले नाही म्हणून उर्दू घर पडित ठेवले. त्यामुळे उर्दू घरास आग लागली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतर पुन्हा उर्दू घरावर लाखो रुपयांचा निधी खर्च करुन उभारण्यात आले. काही दिवसापूर्वी या उर्दू घराचे थाटामाटात उदघाटन झाले असले तरी शहरातील महापालिका अंतर्गत असणारे अनेक वाचनालयाच्या वास्तु बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी महापालिकेचे कार्यालय सुरु करुण्यात आली.

तीच अवस्था कालांतराने उर्दू घरची होवू नये म्हणजे नांदेडकरांनी काही तरी कमावले असेच म्हणावे लागेल. अनेक जुन्या वास्तु संपुष्टात आणून नवीन वास्तुचे रुपांतर बिओटी तत्त्वावर करण्याचा पायंडा महापालिकेने पाडला आहे. महापालिकेकडे असलेले सर्व भूखंड बिओेटी तत्वावर देवून महापालिका कफलक होत असल्याचे दृष्य नांदेडकर उघड्याडोळ्यांनी पाहत आहेत. यासाठी नांदेडकरांनी संघटीत होवून अंकुश ठेवणे हाच पर्याय समोर राहिला आहे असे शेवटी निवृत्त भारतीय नौदल सेना अधिका-याने मत व्यक्त केले आहे.

संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज पालख्यांचे स्वागत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या