25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeनांदेडवाळु घाटावर महसूल विभागाची कारवाई

वाळु घाटावर महसूल विभागाची कारवाई

एकमत ऑनलाईन

नांदेड/लोहा : लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथील वाळू घाटांवर महसूल विभागाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी दुचाकीवर जावुन पाहणी केली असता सदर घाटावरून एक हायवा व दोन ट्रक्टरमधून वाळू उपसा करत असतांना त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याकडुन ५ लाख ६२ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे. जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असून शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल वाळू माफियांकडुन बुडत आहे. मात्र महसूल विभाग मौन बाळगुन कारवाईला सामोरे जात नाही.

अनेकवेळा प्रसार माध्यमांनी सुचना करूनही त्या ठिकाणी कारवाई होत नाही. ही खेदाची बाब आहे. ७ मे रोजी सकाळी लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या सहका-यांनी दुचाकीवरून बेटसांगवी वाळुघाट गाठला. व या ठिकाणी नदीपात्रात जावुन पाहणी केली असता अवैध वाळु उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी एक हायवा व दोन ट्रॅक्टर मधुन वाळुची वाहतुक होत असतांना तहसीलदारांनी त्यांना रंगेहात पकडले व त्यांच्याकडुन ५ लाख ६२ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला . सकाळी ७ वाजल्यापासुन महसूल विभागाचे कर्मचारी नदीपात्रात उतरून कारवाई करत होते. या दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपास ६ तराफे जाळुन या पथकाने नष्ट केली आहेत.

या कामगिरीत लोह्याचे तहसीलदार परळीकर, मंडळ अधिकारी डी.एल. कटारे , तलाठी कल्याण हिवंत , जाधव , आसपुलवार, कांबळे, कल्याणकर , सोनखेड ठाण्याचे पोउनि. मांजरमकर आदींचा समावेश आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे वाळू माफियांची धाबे दणाणले असून अनेकांनी वाहनांसह पळ काढला आहे. मात्र दोन वाहने पथकाला जाग्यावर सापडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. मात्र अनेक वाहने पळुन जाण्यात यशस्वी झाले असल्याची चर्चा परिसरात ऐकावयास मिळत आह.

लोकप्रतिनिधींना रस्त्यातच आडवा; उदयनराजे आक्रमक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या