27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeनांदेडरस्त्यावर बांधकाम साहित्य; वाहतुकीला अडथळा

रस्त्यावर बांधकाम साहित्य; वाहतुकीला अडथळा

एकमत ऑनलाईन

हदगाव : शहरातील नांदेड – हदगाव रोड उमरखेड पॉईंट येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे बांधकाम विशेष वैशिष्ट्ये पूर्ण योजना अंतर्गत ७५ लक्ष रुपयांचा निधी असून हे काम बंद आहे.

या बांधकामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण व आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते एक वर्षांपूर्वी करण्यात आले. तरी पण प्रवेशद्वाराचे काम अत्यंत धीम्या गतीने चालू आहे आता तर पावसाळ्याचे दिवस असून काम बंद आहे.

परंतु बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून गुत्तेदार बेफिकीर बसले आहेत रस्त्यावर असलेल्या बांधकाम साहित्यामुळे नांदेड – हदगाव.- उमरखेड मार्ग जाणा-्या वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शहरातील उमरखेड पॉईंट हा मोठा रहदारीचा मार्ग आहे एकीकडे वाहने उमरखेड कडे जातात तर दुसरीकडे हदगाव आणि नांदेड कडे जातात त्याच ठिकाणी भुसार मार्केट आहे व मोठे मोठे उपहार गृह आहेत शहराच्या वाहनांसाठी लागणारे दोन पेट्रोल पंप त्याच मार्गावर आहेत त्यामुळे त्या ठिकाणी एकच गर्दी होते आणि त्यात रस्त्यावर असलेले बांधकाम साहित्य असल्याने त्या ठिकाणी छोटेमोठे अपघात घडत आहेत.

अनेक वेळा दोन चाकी वाहन चालवताना घसरून पडत आहेत वाटेतच गिट्टी. वाळू व बांधकाम साहित्य असल्याने वाहनाला जाण्यासाठी ईतर मार्ग काढलेला नसल्याने त्या ठिकाणी एकच गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शकता नाकारता येत नाही जर एखादी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार कोण ? रस्त्यावर बांधकाम साहित्य सोडून जाणारा गुत्तेदार की नगरपरिषद असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी वरिष्ठांनी रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेवणा-या बेफिकीर गुत्तेदारांना नोटीस देऊन रस्ता मोकळा न केल्यास साहित्य जप्त करण्यात यावे व नांदेड ते हदगाव उमरखेड पॉईंट जवळ होत असलेली गर्दी कमी करावी व रस्ता मोकळा करावा अशी मागणी ये जा करणा-्या वाहन धारकांतुन होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या