22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची चाळणी

जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची चाळणी

एकमत ऑनलाईन

माहूर: किनवट माहूर राष्ट्रीय महामागार्चे काम थंड पडल्याने पावसाळ्यात येथील वाहतुकीची बिकट स्थिती निर्माण झाली आहे.त्या मुळे तेलंगाना ला जोडणा-या या महत्त्वपूर्ण मार्गावर जड वाहने अडकून पडत असल्याने सिमेंट ची वाहतूक करणाºया ओवर लोड जड वाहनांनी वाहतुकीचा प्रयायी मार्ग म्हणून ग्रामीण रस्त्याचा वापर सुरू केल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी होत आहे.

विदभार्तील धनोडा ते माहूर – किनवट महामागार्ची कामे सद्यस्थितीत अर्धवट अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू झाला असताना ही या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत़.त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूकही पूर्णत: कोलमडली आहे़.तेलंगाना कडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने व चंद्रपूर येथे सिमेंट फॅक्टरी असल्याने या रस्त्यावरील जड वाहतूक प्रभावित झाली आहे,.मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक ग्रामीण भागातून होत असल्याने सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद अंतर्गत बांधण्यात आलेले रस्ते लवकर खराब होण्याची भीती आहे.माहूर तालुक्यातील या मार्गावर सिमेंट ची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरू आहे. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये ही वाढ झाली आहे.ग्रामीण भागातून होत असलेली जड वाहनांची वाहतूक कोण थांबवणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read more  संचारबंदीतही कोरोनाचा कहर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या