22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडप्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या रस्त्याचे काम निकृष्ट

प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या रस्त्याचे काम निकृष्ट

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर (प्रतिनिधी) : खा. हेमंत पाटील व आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उद्घाटन केलेल्या मौजे पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरून विदर्भातील गांजेगाव, ढाणकी, उमरखेड, पुसद, यवतमाळकडे जाण्यासाठी सोपा जलदचा मार्ग म्हणून नावारूपास आलेल्या या रस्त्याचे सध्या निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व उपअभियंत्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी पळसपूर ग्रामस्थांनी केली आहे,

तालुक्यातील मौजे पळसपूर -डोल्हारी-सिरपल्ली मार्गावरुन प्रवाशांना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता, त्यामुळे या रस्त्याची मागणी येथील ग्रामस्थांनी खा. हेमंत पाटील यांच्याकडे केली होती. खासदारांनी लक्ष घातल्यानंतर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. मात्र रस्त्याच्या कामाला संथ गतीने आणि गुत्तेदार अभियंत्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचा मांज-या खडक असलेला दगड व मातीमिश्रित मुरुमाचा वापर केला जात आहे.

अंदाजपत्रकाला बगल देत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभाग जि.प.नांदेड शाखा अभियंता निखिल कान्ािंदे व गुत्तेदार मे.एम.ए.सिद्धिकी औरंगाबाद यांनी ग्रामीण रस्त्यातून आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील या हेतूने रस्त्यावरील कामास सुरूवात केली. पण हा रस्ता बारा किलोमीटर अंतराचा असून सात कोटी तीस लाख चोवीस हजार रुपयांच्या रस्त्याचे मजबुतीकरण करून डांबरीकरण करण्याच्या कामाला संथगतीने सूरूवात करून मातीमिश्रीत मुरूम आणि खराब दगड वापरून सबंधित कंत्राटदार

मे.एम.ए.सिद्दीकी हे काम करत आहेत. रस्त्याचे व्यवस्थित खोदकाम करून मजबुतीकरण करायचे सोडून केवळ वरचा भागच तेवढा दबई करून थातूर-मातूर पध्दतीने जेसीबीने उकरून रस्त्याच्या कामाची विल्हेवाट लावण्याचे काम कंत्राटदार मे.एम.ए.सिद्दीकी औरंगाबाद यांच्या कडून होत आहे. कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदाराविरोधात कार्यवाही करण्याची मागणी पळसपूर ग्रामस्थांनी केली आहे.
पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली रस्त्याची विल्हेवाट सर्वजण मिळून लावत आहेत.

रस्त्याच्या कामाला वापरल्या जात असलेला दगडावरून मोठे वाहन गेल्यास तो दगड चुरा होत आहे. हा दगड रस्त्याच्या कामाला वापरल्यास रस्ता लवकरच खचेल आणि पुन्हा या रस्त्यावरून प्रवास करणा-या नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे, त्यामुळे माती मिश्रीत मुरूम, निकृष्ट दर्जाचा दगड कंत्राटदार मे.एम.ए. सिद्दीकी औरंगाबाद हे वापरत असताना एकाही लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रस्त्यावरून लग्न सोहळ्यासाठी विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, वेगवेगळ्या पक्षाचे सत्ताधारी व विरोधक राजकीय तालुकाध्यक्ष तसेच जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या नेत्यांनी प्रवास केला. परंतू एकाही नेत्याने या रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिले नाही. केवळ लोकप्रतिनिधी मतासाठीच जनतेच्या दारी जातात की काय ? असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या