22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeनांदेडगुंगीचे औषध देवुन डॉक्टरला लुटले

गुंगीचे औषध देवुन डॉक्टरला लुटले

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रवासा दरम्यान एका डॉक्टरला अज्ञात इसमांनी गुंगीचे औषध देवुन लुटल्याची घटना सिकंद्राबाद ते बिलोली दरम्यान बी.आर. ट्रॅव्हल्समध्ये घडली. गुंगीच्या औषधाने डॉक्टर बेशुध्द होताच सोन्याची चैन, दोन अंगठ्या व नगदी रक्कम असा सव्वा लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळताच एसटी महामंडाळासह खाजगी ट्रॅव्हल्सही सुरू झाल्या आहेत. अशाच खाजगी ट्रॅव्हल्समधुन प्रवास करतांना एका डॉक्टरसोबत धक्कादायक घटना घडली. डॉक्टर शालिकराम किशन जाधव वय ३४ रा.माथमळ ता.लोणार जि.बुलढाणा ह.मु.यशोदा हॉस्पीटल शिवाजीनगर सिकंद्राबाद ते कामारेड्डी बिलोली बी.आर ट्रॅव्हल्समधुन प्रवास करीत होते. दि. १० नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊ ते दि.११ नोव्हेंबरच्या ३ वाजेदरम्यान डॉ.शालीकराम यांच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या अनोळखी इसमाने कोल्ड्रींग्स मधुन त्यांना कोणतेतरी गुंगीचे औषध पिण्यास देवुन बेशुध्द केले. यानंतर सिकंद्राबाद ते बिलोली दरम्यानच्या प्रवासात डॉक्टरकडील ९० हजार रूपये किमतीची सोन्याची चैन, ३० हजार रूपयांच्या दोन अंगठ्या, पॉकिटमधील नगदी १२०० रूपये, यासह अधार, ड्रायव्हिंग लायसन्स, चार एटीएम कार्ड असा जवळपास १ लाख २१ हजार २०० रूपयांचा ऐवज लंपास केला. यानंतर अज्ञात इसमाने पोबारा केला.

सदर घटना शुध्दीवर आल्यानंतर डॉक्टर शालीकराम यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात डॉक्टर शालिकराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स तसेच महामंडळाच्या बसमधुन प्रवास करणा-या प्रवाशांचा ऐवज चोरणा-या टोळीमुळे प्रवाशात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चो-यांचे सत्र सुरूच: तीन महिलांचे गंठण लंपास
गेल्या काही दिवसापासून दुचाकीस्वार चोरट्यांनी पोलीसांना खुलेआम आव्हाण देत महिलांचे दागिणे पळविण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. ऐन दिवाळीत काळात पुन्हा शहराच्या वेगवेगळ्या भागातील तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केले. चो-यांचे सत्र कायम सुरूच असल्याने महिलांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे.

गेल्या काही दिवसापासून दुचाकीस्वार चोरट्यांचा शहरात धुमाकुळ सुरू आहे.दररोज कुठे ना कुठे ना महिलांचे दागिणे पळविण्याच्या घटना घडत आहेत. पोलीसा खुलेआम आव्हाण देत दुचाकीस्वार चोरट्यांनी ऐन दिवाळी काळात शहरातील वेगवेगळया भागात तीन महिलांचे सोन्याचे गंठण लंपास केले आहे.यात मंत्रीनगर भागातील मनिषा संजय मेडेवार या सकाळी सात वाजेच्या सुमारास काकड आरती करुन घराकडे आपल्या मैत्रीणीसोबत पायी जात होत्या. यावेळी त्यांच्या मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३८ हजार रुपये किमतीचे गंठण हिसकावून पळ काढला. यावेळी श्रीमती मेडेवार यांनी आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोरटे फरार झाले.

यानंतर भावसार चौक परिसरातील गल्लीतील गोदावरी रत्नपारखे राहणार जंगमवाडी आणि प्रीती प्रदीप वहीनकर या दोघी काकड आरती करुन पायी घराकडे जात होत्या. त्यांना गाठून अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी पळविले. या प्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात या घटनांची तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक बोनवाड करत आहेत. दि. १६ नोव्हेंबरच्या सकाळी आठच्या सुमारास जुना कौठा भागातील एका खासगी रुग्णालयातून संध्या विष्णुपुरीकर या मामा चौकमार्गे आपल्या घराकडे जात होत्या. यावेळी दुचाकीवरील चोरटयांनी मामाचौक दरम्यान त्यांच्या महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीचे गंठण पळविले.

या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. संध्या विष्णुपुरीकर रा. पावडेवाडीनाका यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून दुचाकीस्वार चोरांनी पोलीसांना जणू काही खुलेआम आव्हाण दिले आहे. की काय असे वाटत आहे.तर दररोज घडणा-या या चोरीच्या घटनामुळे महिलांना घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या