28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeनांदेडविनाकारण सलाईन लावून रुग्णांची लूट

विनाकारण सलाईन लावून रुग्णांची लूट

एकमत ऑनलाईन

शिवणी : कोरोनाच्या भितीपोटी किरकोळ आजारांसाठी आलेल्या रूग्णांना विनाकारण सलाईन लावून काही डॉक्टर पैशासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ करत आहेत.याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काशिनाथ मुंडे यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना नोटीस बजावल्या आहेत.

किनवट तालुक्यातील शिवनी भागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसोंदिवस वाढत चालला आहे. यात प्रामुख्याने अनेकांना ताप, सर्दी,खोकला, अंग मोडून येणे अंग दुखणे अशी लक्षणे घराघरात दिसून येत आहेत. तर किनवट तालुक्यातील शिवनी व परिसरातील नागरिक शिवनी येथील खाजगी डॉक्टरांकडून आपला उपचार करण्यासाठी जात असतात.परंतु या खासगी डॉक्टरांनी रुग्णांना थोडी जरी व्याधी झाली तरी हे लोक त्यांना खूप मोठा आजार आहे असे भासवून त्यांना गरज नसतांना तीन-तीन सलाईन लावून रुग्णांना हजारो रुपयांचा गंडा घालत आहेत.

यात सध्या किरोनाचाचा रुग्ण त्यांच्याकडे गेला की आमच्याकडे कोरूनासह इतर सर्व आजारांचा रामबाण उपाय आहे,असे सांगत त्यांना तीन-तीन सलाईन लावणे असल्याचे प्रकार असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कानिफनाथ मुंडे यांना काही रुग्णांद्वारे मिळाली. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्याने डॉ. मुंडे यांनी याची तात्काळ दखल घेत या खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना गरज नसताना विनाकारण सलाईन न लावणे बाबत नोटीस देण्यात आले.

या नोटीसमध्ये सध्यास्थितीत शिवनी व परिसरातील वाडा तांड्यातील कोरोना रुग्णांची दिवसोंदिवस वाढ होत आहे गरजू रुग्ण खाजगी डॉक्टर म्हणून आपल्याकडे येत असतात परंतु आपण त्यांना गरज नसतांना तीन-तीन सलाईन लावून त्या रुग्णांना धोक्यामध्ये टाकू नका अशी सक्त ताकीद दिली आहे. कोरोना संसगार्मुळे रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात होऊन सदरील रुग्णांचा ऑक्सीजन कमी होत आहे व सदरील रुग्ण क्रिटिकल होऊन त्यांना क.उ.व मध्ये भरती करण्याची वेळ येत आहे.

तर काहीजण शेवटच्या श्वासाच्या उंबरठ्यावर आहे ही गंभीर बाब प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कानिफनाथ मुंडे यांच्या निदर्शनास आल्याने शिवनी येथील खाजगी वैद्यकीय व्यापा-्यांना एका सूचना पत्राद्वारे कडक इशारा दिला आहे.तर सध्या स्थिती मध्ये तापीच्या रुग्णांना अतिरिक्त सलाईन लावणे टाळावे. जर या सूचनेचे पालन केले गेले नाही अतिरिक्त सलाईनमुळे रुग्ण गंभीर झाल्यास सदरील रुग्णाची एम. एल.सी.करून संबंधित वैद्यकीय व्यवसायिकांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

परभणीत दुकाने सुरू ठेवल्यास होणार पोलिस कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या